राष्ट्रीय कविसंमेलनात ‘पावसाळी’ काव्यधारा!
गोवा राष्ट्रीय कविसंमेलनात बेळगावच्या कवयित्रींच्या काव्यवर्षावाला रसिकांची दाद!
पणजी (गोवा) : ‘श्रीसाई प्रतिष्ठान, पुणे’ यांच्या वतीने रविवार, दि. १२ ऑक्टोबर २०२५ रोजी ‘पाऊस’ या विषयावर आधारित राष्ट्रीय कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले. या कविसंमेलनात देशभरातील कवी-साहित्यिकांनी सहभाग घेत उत्स्फूर्त काव्य सादरीकरणाने वातावरण रंगवले.
या कार्यक्रमात बेळगावच्या कवयित्री पूजा सुतार, शुभदा खानोलकर, स्नेहल बर्डे तसेच प्रा. खानोलकर यांनी आपल्या नावीन्यपूर्ण, भावस्पर्शी काव्यरचना सादर करून प्रेक्षकांची मनं जिंकली. पावसाच्या विविध छटांना शब्दबद्ध करत या कवयित्रींनी सृजनशीलतेचा अद्भुत आविष्कार सादर केला.
कार्यक्रमाच्या वेळी मा. श्री सुभाष शिरोडकर (गोवा मंत्री), डॉ. संजयभाऊ चौधरी (राष्ट्रीय अध्यक्ष) तसेच इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.
‘श्रीसाई प्रतिष्ठान, पुणे’ यांच्या या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, उपस्थित साहित्यप्रेमींनी संस्थेच्या या सांस्कृतिक उपक्रमाचे कौतुक केले.
पावसाच्या भावविश्वात शब्दरूपी थेंबांनी सजलेले हे कविसंमेलन खरोखरच रसिकांसाठी अविस्मरणीय ठरले .

Post a Comment
0 Comments