आमदार शिवाजी पाटील यांच्या फंडातून आसगावला 65 लाखांचा विकासनिधी
विविध विकासकामांचे भव्य उद्घाटन
आसगाव, ता. चंदगड — चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. शिवाजी पाटील यांच्या फंडातून आसगाव ग्रामविकासासाठी 65 लाख रुपयांचा विकासनिधी मंजूर झाला असून, या निधीतून रस्ते, पाणीपुरवठा, सार्वजनिक सुविधा आदी विविध कामांचे आज भव्य उद्घाटन करण्यात आले.
आज आसगाव येथे मोठ्या उत्साहात पार पडलेल्या या कार्यक्रमाला मान्यवरांची उपस्थित होता. यावेळी मा. शांताराम (बापू) पाटील, मा. दिपकदादा पाटील, मा. सचिन बल्लाळ, मा. लक्ष्मण गावडे, मा. विशाल बल्लाळ, मा. अशोक कदम, मा. संजय गावडे यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, भाजपा बूथ प्रमुख, शक्ती प्रमुख, सुपर वॉरियर्स तसेच गावातील मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आमदारांकडून सातत्याने मिळणाऱ्या सहकार्याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. मंजूर निधीमुळे आसगावच्या पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा होणार असून, आगामी काळात गाव विकासाची गती अधिक वाढेल, अशी भावना व्यक्त करण्यात आली.


Post a Comment
0 Comments