खेडूत चषक वक्तृत्व स्पर्धा
उद्या महात्मा फुले विद्यालय कारवे येथे बक्षिस वितरण समारंभ
शब्दांना धार, विचारांना उंची आणि यशाला मानाचा सन्मान देणाऱ्या खेडूत चषक वक्तृत्व स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ येत्या शनिवार, दि. २४ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता महात्मा फुले विद्यालय व गुरुवर्य म. भ. तुपारे ज्युनिअर कॉलेज येथे आयोजित करण्यात आला आहे.
या समारंभात वक्तृत्व स्पर्धेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा आकर्षक गौरवचिन्ह, प्रमाणपत्र व पुस्तक देऊन यथोचित सन्मान करण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या यशामागे मोलाची भूमिका बजावणाऱ्या पालकांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात येणार असून, मार्गदर्शक शिक्षकांनाही मानाचा सन्मान मिळणार आहे. संस्थेच्या मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या शुभहस्ते हा गौरवसोहळा संपन्न होणार आहे.
भाषणाचा सामर्थ्य अनुभवण्याचा, आत्मविश्वास व अभिव्यक्तीला चालना देणारा आणि यशाचा उत्सव साजरा करणारा हा सुवर्णक्षण ठरणार आहे. कार्यक्रमास विद्यार्थी, पालक, शिक्षक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आलेआहे.
हा कार्यक्रम खेडूत शिक्षण मंडळ यांच्या वतीने आयोजित करण्यात आला असून, स्पर्धा संयोजक व सचिव श्री. एम. एम. तुपारे यांनी सर्वांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

Post a Comment
0 Comments