चंदगडचा ज्ञानदीप ‘कोजिम प्रेरणा’ने गौरवला
राघवेंद्र इनामदार यांचा सन्मान
चंदगड :चंदगड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रातील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व राघवेंद्र गणपतराव इनामदार यांना प्रतिष्ठेच्या कोजिम प्रेरणा पुरस्कार ने सन्मानित करण्यात आले. प्रसिद्ध लेखक संदीप वाकचौरे यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठ चे माजी परीक्षा प्रमुख बी. एम. हिर्डेकर होते.
इनामदार सर यांची शैक्षणिक पात्रता बी.ए., बी.एड., डी.इ.पी.एम. अशी शैक्षणिक पात्रता लाभलेले .इनामदार सर सध्या राजगोळी खुर्द हायस्कूलमध्ये कार्यरत असून त्यांच्या नेतृत्वाखाली शाळेने शंभर टक्के निकालाची परंपरा जोपासली आहे. “मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” उपक्रमात सलग तीन वर्षे तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे.
शैक्षणिक कार्याबरोबरच सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी गावातील विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांत सक्रिय सहभाग नोंदवला आहे. हायस्कूल, प्राथमिक आरोग्य केंद्र व इतर सार्वजनिक सुविधांसाठी कुटुंबीयांनी दिलेली जमीन ही त्यांच्या समाजनिष्ठेची साक्ष आहे.
आजोबा-आजी विनय दिन, आदर्श माता-पिता पुरस्कार, डिजिटल शाळा यांसारखे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून त्यांनी शिक्षणात संस्कार आणि आधुनिकतेचा सुंदर संगम साधला आहे.
या सन्मानामुळे चंदगड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात अभिमानाची नवी भर पडली असून, इनामदार यांचे कार्य विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी दीपस्तंभ ठरत आहे.
कार्यक्रमाला चंदगड तालुका मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष मोहन पाटील, रविंद्र पाटील, महादेव शिवणगेकर, संजय साबळे, व्ही एल सुतार, बी एन पाटील, कमलेश कर्णिक, राजेंद्र शिवणगेकर उपस्थित होते .

Post a Comment
0 Comments