आगीत घर भस्मसात झालेल्या स्वाती कुंभार यांना ‘दक्षिण काशी श्री कपिलेश्वर मंदिर ट्रस्ट’कडून मदतीचा हात
बेळगाव (प्रतिनिधी) : सिंगिनकोप येथे राहणाऱ्या स्वाती संतोष कुंभार यांचे कौलारू घर लागलेल्या आगीत पूर्णपणे भस्मसात झाले. या दुर्दैवी घटनेत घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले असून कुंभार कुटुंबावर मोठे संकट ओढवले आहे.
या पार्श्वभूमीवर बेळगाव येथील दक्षिण काशी श्री कपिलेश्वर मंदिर ट्रस्टच्या वतीने स्वाती कुंभार यांना मदतीचा हात देण्यात आला. ट्रस्टतर्फे त्यांना आर्थिक सहाय्य तसेच संसारोपयोगी साहित्य प्रदान करण्यात आले.
शनिवार, दि. 14 रोजी ही मदत स्वाती कुंभार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. यावेळी ट्रस्टचे अभय लगडे, रमेश देसुरकर, अविनाश खन्नुकर, प्रसाद बाचोळकर आणि कृष्णा कुंभार उपस्थित होते.
आगीत सर्वस्व गमावलेल्या कुटुंबाला ट्रस्टने दिलेल्या या मदतीमुळे त्यांना दिलासा मिळाला असून या सामाजिक उपक्रमाचे परिसरातून कौतुक व्यक्त होत आहे.

Post a Comment
0 Comments