Type Here to Get Search Results !

दहावीच्या विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जावे – रणजीत चौगुले

 दहावीच्या विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जावे – रणजीत चौगुले

मराठा मंडळ हायस्कूलमध्ये मार्गदर्शनपर कार्यक्रम



बेळगाव (प्रतिनिधी )  : येथील मराठा मंडळ हायस्कूल, चव्हाट गल्ली येथे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सरकारी सरदार्स हायस्कूलचे शिक्षक रणजीत चौगुले यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीसंबंधी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य एम. के. पाटील होते. व्यासपीठावर एम. एस. संभाजीचे, जे. एल. पाटील व जी. बी. पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले. त्यानंतर दहावीच्या विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीटाचे पूजन करून परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.


यावेळी मार्गदर्शन करताना रणजीत चौगुले यांनी सांगितले की, दहावीची परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कोणतीही भीती न बाळगता आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जावे. प्रश्नपत्रिका नीट वाचून उत्तर लिहिणे, वेळेचे योग्य नियोजन करणे, उत्तरपत्रिका स्वच्छ व मुद्देसूद लिहिणे यामुळे चांगले गुण मिळू शकतात असे त्यांनी सांगितले.



यावेळी जी. बी. पाटील व जे. एल. पाटील यांनी विद्यार्थ्यांना सातत्याने अभ्यास करण्याचे महत्त्व सांगितले. एम. एस. संभाजीचे यांनी विद्यार्थ्यांना सकारात्मक विचार ठेवून अभ्यासात एकाग्रता राखण्याचा सल्ला दिला.


कार्यक्रमात उपप्राचार्य एम. के. पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. दहावीच्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभाग घेतला. शेवटी एम. के. पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

Post a Comment

0 Comments