आमदार शिवाजी पाटील (भाऊ) विठ्ठलनामात तल्लीन; वारकऱ्यांसमवेत भक्तिरसात रंगला अविस्मरणीय क्षण
चंदगड (शिवसंदेश न्यूज )दि. 14 : आषाढी वारीचे भक्तिमय वातावरण, टाळ-मृदंगाचा निनाद आणि "ज्ञानोबा-तुकाराम", "विठ्ठल... विठ्ठल..." या अखंड नामघोषाने सावर्डे परिसर भक्तिमय झाला असताना, चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजी पाटील (भाऊ) यांनी पायादिंडीत सहभागी होत वारकऱ्यांसमवेत विठ्ठलभक्तीचा आनंद लुटला.सावर्डे येथे आषाढी वारी साठी गोव्याहून पंढरपूरला निघालेल्या पायीदिंडीचे मनोभावे सेवा आमदार शिवाजी पाटील (भाऊ)यांनी केली .
पद, प्रतिष्ठा आणि राजकारणाचा कोणताही आभास न ठेवता आमदार शिवाजी पाटील (भाऊ) वारकऱ्यांच्या रांगेत मिसळले. टाळ-मृदंगाच्या तालावर हरिनामाचा गजर करत त्यांनी विठुरायाच्या चरणी कृतज्ञतेने नतमस्तक होत भक्तिभाव व्यक्त केला. त्यांच्या या सहज, साध्या आणि सात्त्विक सहभागाने वारकऱ्यांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
यावेळी त्यांनी वारकऱ्यांना आषाढी वारीच्या शुभेच्छा देत विठ्ठल-रखुमाईच्या कृपेने चंदगड विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक कुटुंब सुखी, निरोगी आणि समृद्ध राहो, शेतकऱ्यांच्या शिवारात भरघोस पीक यावे, युवकांना रोजगार व प्रगतीच्या संधी मिळाव्यात आणि सर्वांच्या जीवनात सुख, शांती व समाधान नांदो, अशी प्रार्थना केली.
वारकरी संप्रदाय ही महाराष्ट्राच्या संतपरंपरेची अमूल्य परंपरा असून, समाजात समता, सेवा, बंधुभाव आणि भक्तीची शिकवण देणारी ही संस्कृती जपणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
आमदार शिवाजी पाटील (भाऊ) यांचा वारकऱ्यांसोबतचा हा आत्मीय सहभाग उपस्थितांच्या मनाला भावला. जनसेवा आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम घडविणारा हा क्षण अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला.
राम कृष्ण हरी...!
ज्ञानोबा माऊली तुकाराम...!
पांडुरंग हरी विठ्ठल...! 🙏🚩


Post a Comment
0 Comments