Type Here to Get Search Results !

एक दिवस माझ्या बळीराजासाठी" उपक्रमांतर्गत कडलगे बु. येथे वृक्षारोपण उत्साहात

 "एक दिवस माझ्या बळीराजासाठी" उपक्रमांतर्गत कडलगे बु. येथे वृक्षारोपण उत्साहात



कडलगे बु. (प्रतिनिधी) : "एक दिवस माझ्या बळीराजासाठी" या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कडलगे बु. येथे वृक्षारोपण व पर्यावरण जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाला पंचायत समिती सदस्य पांडुरंग बेनके, सरपंच परशराम पाटील, उपसरपंच ज्ञानेश्वर पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष गावडू पाटील, मुख्याध्यापिका लता बिर्जे, मुख्याध्यापक संजय भांदूगरे, कृषी अधिकारी किरण पाटील यांच्यासह ग्रामस्थ, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



कार्यक्रमात पांडुरंग बेनके यांनी वृक्षलागवडीचे महत्त्व विशद करताना प्रत्येकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचे आवाहन केले. कृषी अधिकारी किरण पाटील यांनी शेतकऱ्यांसाठी शासनाच्या विविध कृषी योजना, वृक्षलागवड अनुदान व पर्यावरणपूरक शेतीविषयी सविस्तर माहिती दिली.


यावेळी रवींद्र पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना, "वृक्षारोपण ही केवळ एक औपचारिक मोहीम नसून ती आपल्या जीवनाचे, शेतीचे आणि पर्यावरणाचे संरक्षण करणारी जनचळवळ आहे. वृक्ष लावणे जितके महत्त्वाचे, तितकेच त्यांचे संगोपन करणेही आवश्यक आहे," असे प्रतिपादन केले.


कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवरांचा शाल, श्रीफळ व रोप देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर शाळेच्या परिसरात विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.



या कार्यक्रमास तानाजी गडकरी, तानाजी पाटील, केशव पाटील, मारुती बुवा, लक्ष्मण कोले, पोलिस पाटील सागर कांबळे ,शाळा व्यवस्थापन  कमिटी अध्यक्ष अशोक पाटील , ग्राम पंचायत सदस्य धोडिंबा कांबळे, तुकाराम पाटील, दत्तात्रय कांबळे, नारायण पाटील, मनोहर पाटील, कमल हिंदूराव कांबळे, सुधा रमेश कांबळे, दौलत पाटील, ग्रामसेवक रविराज चिलमी, वैभव पाटील यांच्यासह ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल बागिलगेकर यांनी केले.

Post a Comment

0 Comments