कडलगे बु. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी तारांगण दर्शनातून विद्यार्थ्यांनी अनुभवली अंतराळ सफर
कडलगे बु., दि. ३० : कडलगे बु. येथील हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांसाठी पोलाद स्टील जालना यांच्या माध्यमातून 'तारांगण दर्शन ' हा आगळावेगळा शैक्षणिक उपक्रम आयोजित करण्यात आला. इयत्ता ८ वी, ९ वी आणि १० वीच्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमातून अंतराळ विश्वाची रोमांचक सफर अनुभवली.
तारांगणामध्ये विद्यार्थ्यांना ग्रह, तारे, आकाशगंगा, चंद्र, चांद्रयान-१ व चांद्रयान-२ मोहिमा तसेच विविध अवकाशीय घटना यांचे आकर्षक दृकश्राव्य सादरीकरण करण्यात आले. या माध्यमातून विद्यार्थ्यांना खगोलशास्त्राची माहिती मनोरंजक आणि प्रत्यक्ष अनुभवातून मिळाली. विश्वाची अफाट व्याप्ती, ग्रह-ताऱ्यांची रचना आणि अंतराळ संशोधनाची प्रगती याबाबत विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्सुकता निर्माण झाली.
या उपक्रमासाठी तानाजी चौगुले व किशोर गोटे यांनी तंत्रज्ञ म्हणून मार्गदर्शन केले. तारांगणातील हा अनुभव अत्यंत वेधक आणि ज्ञानवर्धक असल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सरपंच परशराम पाटील व रवी पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन अनिल बागिलगेकर यांनी स्वागत केले.
यावेळी मुख्याध्यापक एस. जे. भांदूगरे, बी. वाय. पोटे, आर. व्ही. नाईक मॅडम ,अनिल जाधव , अनिशा गुरव मॅडम , शिवाजी काटे तसेच शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान, खगोलशास्त्र आणि अंतराळ संशोधनाबद्दल आवड निर्माण करणारा हा उपक्रम अत्यंत प्रेरणादायी ठरला असून, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला निश्चितच चालना मिळणार असल्याचे उपस्थितांनी सांगितले.



Post a Comment
0 Comments