वैद्यनाथ मंदिरात आमदार सतेज पाटील यांचे स्वागत
दूध उत्पादकांच्या हितासाठी गोकूळ सत्ता पुन्हा येण्यासाठी सतेज पाटील यांचे वैद्यनाथाकडे साकडे
देवरवाडी (शिवसंदेश News ) दि 27 : चंदगड तालुका दौऱ्यावर आलेले कोल्हापूर जिल्ह्याचे काँग्रेसचे नेते तथा मा.आमदार श्री. सतेज उर्फ बंटी पाटील यांनी देवरवाडी येथील वैद्यनाथ मंदिरास भेट देऊन श्रावणमासानिमित्त देवदर्शन घेतले. यावेळी टिम संघर्षच्या वतीने त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.
आमदार सतेज पाटील यांनी वैद्यनाथ मंदिरात दर्शन घेऊन गोकूळची सत्ता पुन्हा दूध उत्पादकांच्या हितासाठी यावी, तसेच दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांना न्याय मिळावा, यासाठी देवाला साकडे घातले.
यावेळी दूध संस्था प्रतिनिधी, कार्यकर्ते व ग्रामस्थांशी त्यांनी संवाद साधत विविध प्रश्नांवर चर्चा केली. तसेच लिंगायत समाजाच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन आमदार सतेज पाटील यांना देण्यात आले.
या स्वागत व सदिच्छा भेटीप्रसंगी संघर्ष प्रज्ञावंत शंकर भोगण, वैजनाथ भोगण, अमोल भोगण, शिवकुमार पुजारी, बसवंत पुजारी सर, अमृत भोगण, प्रमोद भोगण, रानबा पाटील, नारायण करडे, अर्जुन भोगण, वैभव करडे, गुंडू खांडेकर, ओंकार पाटील, शिवराज आंदोचे, प्रकाश पुजारी, एकनाथ भोगण, सुनील कांबळे, कृष्णा कांबळे, लक्ष्मण भोगण, गुरुपाद कांबळे, शंकर आडाव, दत्ता मजुकर, मल्लाप्पा आडाव, मष्णु वर्पे यांच्यासह टिम संघर्षचे पदाधिकारी, कार्यकर्ते व देवरवाडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्रावणमासातील भक्तिमय वातावरणात झालेल्या या सदिच्छा भेटीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.




Post a Comment
0 Comments