Type Here to Get Search Results !

दत्तात्रय सावंत यांचा स्वाभिमानी शिक्षकांच्या बळावर उमेदवारी अर्ज दाखल

दत्तात्रय सावंत यांचा स्वाभिमानी शिक्षकांच्या बळावर उमेदवारी अर्ज दाखल

पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत दत्तात्रय सावंत यांचा निर्धार; “लढू आणि जिंकू!”



पुणे ( शिवसंदेश न्यूज ) दि 6 : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीसाठी दत्तात्रय अच्युतराव सावंत यांनी आज पुणे येथे निवडणूक अधिकाऱ्यांकडे आपला नामनिर्देशन अर्ज दाखल केला. यावेळी स्वाभिमानी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

अर्ज दाखल केल्यानंतर सावंत यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, “निवडणूक हा आपल्या चळवळीचा एक भाग आहे. शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि त्यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आपण सातत्याने संघर्ष केला आहे. स्वाभिमानी शिक्षकांच्या बळावर ही निवडणूक लढवणार असून विजय मिळवणार आहोत.”

जुनी पेन्शन योजना, टप्प्यावरील शिक्षकांना टप्पा वाढ, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न आणि शिक्षण क्षेत्रातील विविध प्रलंबित मागण्यांसाठी आपला लढा यापुढेही अधिक ताकदीने सुरू राहील, असा निर्धार सावंत यांनी व्यक्त केला.

“ही केवळ निवडणूक नाही, तर शिक्षकांच्या स्वाभिमानाची आणि हक्कांची लढाई आहे. शिक्षकांच्या विश्वासाच्या बळावर आपण ही लढाई निश्चित जिंकू,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

Post a Comment

0 Comments