तुर्केवाडी येथे उद्या एम.ए. शिक्षणशास्त्र व शालेय व्यवस्थापन पदविका प्रथम वर्षाचा उद्घाटन सोहळा
तुर्केवाडी, दि. ९ ऑक्टोबर : दि महाराष्ट्र एज्युकेशन अँड स्पोर्ट्स अकॅडमी, चंदगड संचलित महादेवराव वांद्रे बी. एड. कॉलेज, तुर्केवाडी येथे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक यांच्या एम.ए. शिक्षणशास्त्र (M-83) व शालेय व्यवस्थापन पदविका (P10) या अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाचा उद्घाटन व स्वागत सोहळा उद्या, शनिवार दि. १० ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ठीक १२ वाजता आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाला संस्थाध्यक्ष मा. डॉ. महादेवराव वांद्रे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. एस. जी. खाडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील.
कार्यक्रमाला संचालिका सौ. मृणालिनी वांद्रे, विभागप्रमुख प्रा. प्रधान ग. गो., संस्था प्रतिनिधी अमेय वांद्रे, ओ. एस. श्रीम. देशपांडे एस. आर., पॉलिटेक्निकचे प्राचार्य गावडे एस. पी., फार्मसी विभागाचे प्रा. अनुज शिंदे, प्रा. मुल्ला एम. आर., प्रा. पाटील वाय. पी. आणि प्रा. पूजा एम. पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
शिक्षण क्षेत्रातील ज्ञान, कौशल्ये आणि शालेय व्यवस्थापनाची क्षमता वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीने हे अभ्यासक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. या सोहळ्याच्या माध्यमातून नवप्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी प्रेरित करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवावी, असे आवाहन केंद्र संयोजक प्रा. एन. जे. कांबळे यांनी केले आहे.

Post a Comment
0 Comments