आसगाव येथील भिमक्रांती संस्थेचा शिवाजीराव पाटील यांना जाहीर पाठिंबा
चंदगड: भिमक्रांती कला, क्रीडा व सांस्कृतिक सेवा संस्था, आसगाव यांनी चंदगड विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार शिवाजीराव पाटील यांना निवेदन सादर केले आहे. या निवेदनात दलित वस्तीतील आंबेडकर भवनासमोर सभा मंडप उभारण्याची आणि भवनाभोवती संरक्षण भिंत बांधून देण्याची मागणी करण्यात आली आहे.
भिमनगर, आसगाव येथील रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबेडकर भवनासमोरील खुल्या जागेत अतिक्रमण होऊन सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे या समस्येवर उपाय म्हणून भवनासमोर मंडप आणि सभोवती संरक्षण भिंत आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. मागील विधानसभेतील निवडणुकीत त्यांनी शिवाजीराव पाटील यांना पूर्णतः पाठिंबा दिला होता, आणि यावेळी शिवाजीराव पाटील यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला .
या पत्रावर भिमक्रांती संस्थेचे पदाधिकारी आणि सदस्यांनी सही केली आहे. सही करणारे सदस्य खालीलप्रमाणे आहेत: अध्यक्ष रमेश जोगा कांबळे, अर्जुन गोविंद कांबळे, राहुल नारायण कांबळे, पांडुरंग बाबू कांबळे, मष्णू लक्ष्मण कांबळे, आप्पा महादेव कांबळे, सुभाष कृष्णा कांबळे, सुनिल गुंडू कांबळे, नामदेव पांडुरंग कांबळे, शंकर तानाजी कांबळे, जयराम तानाजी कांबळे, देमाना तानाजी कांबळे, मष्णू गंगाराम कांबळे, पांडुरंग संतू कांबळे, शामदेव पुंडलिक कांबळे, ज्ञानेश्वर हणमल कांबळे, सचिन हणमंत कांबळे, अनंत देभाना कांबळे, पुजा प्रकाश कांबळे, रेखा बळीराम कांबळे, लक्ष्मी बाबू कांबळे, शांता अर्जुन कांबळे, रसिका पांडुरंग कांबळे, सुगंधा सुनिल कांबळे, संगिता नारायण कांबळे, विठाबाई मष्णू कांबळे, लक्ष्मी नारायण कांबळे.
शिवाजीराव पाटील यांनी या मागणीचे स्वागत केले असून, आमदार म्हणून निवडून आल्यानंतर या विकासकामासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.

Post a Comment
0 Comments