Type Here to Get Search Results !

"बदला आमदार, वाढवा रोजगार" - मानसिंग खोराटे यांच्यावर जनतेचा विश्वास नव्या नेतृत्वाची मागणी

 "बदला आमदार, वाढवा रोजगार" - मानसिंग खोराटे यांच्यावर जनतेचा विश्वास नव्या नेतृत्वाची मागणी

चंदगड मतदारसंघाच्या विकासात मागे राहिल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. रस्ते आणि गटार या मूलभूत सुविधांपलीकडे इथल्या सध्याच्या नेतृत्वाने कधीच पाहिले नाही, असा आरोप जनतेने केला आहे. रोजगार आणि उद्योगाच्या संधींचा अभाव असल्याने बेरोजगारीची समस्या विकोपाला गेली आहे. या परिस्थितीत बदल करण्यासाठी "बदला आमदार, वाढवा रोजगार" हा घोष आता लोकांच्या मनात घर करू लागला आहे.


नेतृत्वातील बदलासाठी मानसिंग खोराटे हे नवा पर्याय ठरू शकतात, अशी भावना नागरिकांमध्ये आहे. नेसरी जिल्हा परिषद मतदारसंघात खोराटे यांच्या जन आशीर्वाद यात्रेला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. त्यांनी रोजगार मेळावे घेत तरुणांसाठी नोकऱ्या मिळवून देण्याचे प्रयत्न केले, तसेच महिलांच्या सक्षमीकरणावर विशेष भर दिला आहे. जनसुराज्य शक्ती पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या खोराटे यांना पाठिंबा देत कार्यकर्त्यांनी त्यांच्या विजयासाठी कंबर कसली आहे.

Post a Comment

0 Comments