Type Here to Get Search Results !

कानडी गावाचा अपक्ष उमेदवार शिवाजीभाऊ पाटील यांना जाहीर पाठिंबा

 कानडी गावाचा अपक्ष उमेदवार शिवाजीभाऊ पाटील यांना जाहीर पाठिंबा


चंदगड विधानसभा मतदारसंघातील लोकप्रिय अपक्ष उमेदवार शिवाजीभाऊ पाटील यांना कानडी गावातील सर्व नागरिकांनी एकत्र येऊन जाहीर पाठिंबा घोषित केला आहे. शिवाजीभाऊ पाटील हे चंदगड भागामध्ये विकासाच्या कामाची गंगा म्हणून ओळखले जातात. यामुळेच या निवडणुकीत त्यांना जास्तीत जास्त मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार कानडी गावाने केला आहे.


कानडी गावातील नागरिकांनी थेट चंदगड सावर्डे येथील शिवाजीभाऊ पाटील यांच्या कार्यालयाला भेट देऊन त्यांची वैयक्तिक भेट घेतली आणि जयघोषामध्ये पाठिंबा घोषित केला. या भेटीदरम्यान गावातील ज्येष्ठ नागरिक, युवक, युवती, महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी गावाचा विकास साधण्याचे तसेच भविष्यातील विविध समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन शिवाजीभाऊ पाटील यांनी दिले, ज्यामुळे संपूर्ण गावाने त्यांच्या उमेदवारीला जाहीर पाठिंबा दर्शवला.


कानडी गावाच्या प्रमुखांच्या उपस्थितीत झालेल्या या भेटीमध्ये नामदेव हरेर, हंबीरराव पडते, शिवाजी कांबळे, विठ्ठल गडदे, नारायण सुभेदार, सदानंद जाधव, महादेव हरेर, महादेव जाधव यांच्यासह गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिक, ग्रामस्थ आणि युवक-युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


गावकऱ्यांनी शिवाजीभाऊ पाटील यांना निवडणुकीत भरघोस मतांनी विजयी करण्याचा निर्धार केला आहे. गावाच्या विकासासाठी शिवाजीभाऊंच्या नेतृत्वावर त्यांना पूर्ण विश्वास असल्याने त्यांनी निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून शिवाजीभाऊंना जाहीर पाठिंबा दिला आहे.


Post a Comment

0 Comments