आरोग्य आणि सुरक्षिततेची सर्वोच्च प्राथमिकता
चंदगड मतदार संघाचे अपक्ष उमेदवार शिवाजी पाटील यांनी आपल्या प्रचारकांना आणि कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत आरोग्य व सुरक्षिततेकडे विशेष लक्ष देण्याचे पत्रक काढून आवाहन केले आहे. या आवाहनामुळे पाटील यांचा जनतेत आणि कार्यकर्त्यांमध्ये एक काळजीवाहू आणि जबाबदार नेता म्हणून नवा आदर निर्माण झाला आहे.
शिवाजी पाटील यांनी प्रचारकांना सुचवले की, "प्रचार मोहिमेत सहभागी होताना योग्य आहार घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. नारळ पाणी, लिंबू पाणी यांचा आहारात समावेश करा आणि उन्हात काम करताना टोप्या वापरा." शिवाय, प्रचार रॅलीत वाहने वेगात चालवू नयेत आणि सभा स्थळी वाहने नीट पार्क करून वाहतूक कोंडी टाळावी, असेही त्यांनी सांगितले.
तसेच, त्यांनी आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्याचे आणि सर्व नियमांचे पालन करून प्रचार मोहीम राबवण्याचे आवाहन केले आहे. पाटील यांची ही जबाबदार आणि संवेदनशील भूमिका निवडणूक प्रक्रियेत त्यांच्या कार्यकर्त्यांना नवा आत्मविश्वास देणारी ठरत आहे.
शिवाजी पाटील यांचे हे पत्रक त्यांच्या कार्यकर्त्यांप्रती असलेल्या काळजीचा पुरावा आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे ते फक्त मतदारच नव्हे, तर आपल्या कार्यकर्त्यांमध्येही आदर्श नेत्याच्या रूपात ओळखले जात आहेत.

Post a Comment
0 Comments