Type Here to Get Search Results !

शिवसेना उपजिल्हाप्रमुख अनिरुद्ध केदारी रेडेकर यांच्यासह शिवसेना कार्यकर्त्यांचा शिवाजीराव पाटील यांना जाहीर पाठिंबा

 शिवसेना उपजिल्हाप्रमुख अनिरुद्ध केदारी रेडेकर यांच्यासह शिवसेना कार्यकर्त्यांचा शिवाजीराव पाटील यांना जाहीर पाठिंबा


चंदगड ( प्रतिनिधी ):चंदगड मतदारसंघाच्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे शिवसेना गटाचे उपजिल्हाप्रमुख अनिरुद्ध केदारी रेडेकर, मल्हार शिंदे, चाळोबा देसाई, शिवसेना चंदगड विधानसभा प्रमुख मारुती नावलगी, आणि बाबू नेसरीकर यांनी आपल्या सर्व कार्यकर्त्यांसह अपक्ष उमेदवार शिवाजीराव पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. यावेळी माजी राज्यमंत्री भरमूआण्णा पाटील उपस्थित होते .

या विशेष कार्यक्रमात अनिरुद्ध केदारी रेडेकर यांनी शिवाजीराव पाटील यांच्या समाजसेवेचे आणि विकासकामांवरील निष्ठेचे कौतुक केले. “शिवाजीराव पाटील साहेब हे लोकांच्या मनात विश्वास निर्माण करणारे आणि चंदगडच्या विकासासाठी सदैव सज्ज असलेले नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली चंदगडच्या प्रगतीला नवा गतीमान मार्ग मिळेल. त्यामुळे त्यांना आमचा आणि सर्व एकनाथ शिंदे गट शिवसेना कार्यकर्त्यांचा संपूर्ण पाठिंबा आहे,” असे रेडेकर यांनी सांगितले.


शिवसेना नेत्यांचा हा महत्त्वपूर्ण पाठिंबा मिळाल्यामुळे चंदगड मतदारसंघात शिवाजीराव पाटील यांच्या विजयाच्या शक्यता अधिक बळकट झाल्या आहेत.


Post a Comment

0 Comments