चंदगड विधानसभा मतदारसंघात अप्पी पाटील यांच्या जनसंवाद परिवर्तन यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद
चंदगड, १३ नोव्हेंबर २०२४:
राजर्षी शाहू समविचारी आघाडीचे अधिकृत उमेदवार अप्पी उर्फ विनायक पाटील यांनी २७१ चंदगड विधानसभा मतदारसंघात जनसंवाद परिवर्तन यात्रा सुरू केली आहे. या यात्रेचा उद्देश ग्रामीण भागातील जनतेशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्यांचे निराकरण करणे व मतदारसंघात राजकीय परिवर्तन घडवण्याचा आहे. श्री. पाटील यांच्या नेतृत्वाखालील या यात्रेला मोठा प्रतिसाद मिळत असून, गावागावात त्यांचे स्वागत करण्यात येत आहे.जनतेशी थेट संवाद साधून समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न
सकाळी दाटे गावातून या जनसंवाद यात्रेची सुरुवात झाली. श्री. पाटील व त्यांच्या टीमने ठरलेल्या वेळापत्रकानुसार विविध गावांना भेटी देत आहेत. प्रत्येक गावात ते स्थानिक जनतेशी थेट संवाद साधत आहेत. आर्थिक, शैक्षणिक, आरोग्य व सामाजिक समस्या समजून घेऊन त्यावर उपाययोजना करण्याची ग्वाही देत आहेत. मतदारसंघातील सर्व स्तरांवर लोकांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करून श्री. पाटील यांचा हा दौरा स्थानिक जनतेसाठी आशेचा किरण ठरत आहे.
प्रमुख नेत्यांची उपस्थिती आणि प्रचार फेरीत कार्यकर्त्यांचा सहभाग
या दौऱ्यात श्री. अप्पी पाटील यांच्यासोबत चंदगडचे नेते गोपाळराव पाटील, प्रभाकर खांडेकर, नितिन पाटील आणि गोविंददादा पाटील , कल्लाप्पाण्णा भोगण यांची प्रमुख उपस्थिती आहे. या नेत्यांसह कार्यकर्ते घरोघरी प्रचार करून मतदारांना भेटत आहेत आणि त्यांना बादली चिन्हासाठी मतदानाचे आवाहन करत आहेत.
आजचा दौरा आणि गावभेटीचे वेळापत्रक
आजचा दौरा सकाळी दाटे गावापासून सुरू झाला असून, बेळेभाट, कुर्तनवाडी, कोरज, नागनवाडी, वाळकुळी, गंधर्वगड, पाटीलवाडा, सातवणे, केंचेवाडी, आमरोळी, पोरेवाडी, मुगळी, सोनारवाडी, गनुचीवाडी, अडकूर, मलगेवाडी, बोंजुर्डी, विझणे, मोरेवाडी, उत्साळी, आलबादेवी, शिरोली, सतेवाडी, पोवाचीवाडी, कानडी आणि शेवटी इब्राहिमपूर येथे या प्रचार फेरीची सांगता होणार आहे.
परिवर्तनासाठी बादली चिन्हावर विश्वास
श्री. अप्पी पाटील यांनी परिवर्तनाची लाट आणण्याच्या संकल्पासह 'बादली' हे चिन्ह निवडून दिले आहे. "बादली निवडूया, परिवर्तन घडवूया!" हा संदेश देत ते लोकांच्या विश्वासास पात्र ठरत आहेत. मतदारसंघातील सर्व गावांतून त्यांना मोठा पाठिंबा मिळत असून, त्यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन यात्रा यशस्वी ठरत आहे.
श्री. अप्पी उर्फ विनायक विरगोंडा पाटील
राजर्षी शाहू समविचारी आघाडीचे अधिकृत उमेदवार
२७१ - चंदगड विधानसभा मतदारसंघ
चिन्ह: बादली
बादली निवडूया, परिवर्तन घडवूया!


Post a Comment
0 Comments