गोरगरिबांचा नेता शिवाजीराव पाटील यांना नाभिक समाजाचा जाहीर पाठिंबा
चंदगड ( प्रतिनिधी ):चंदगड, गडहिंग्लज आणि आजरा तालुक्यातील नाभिक समाज बांधवांनी चंदगड विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शिवाजीराव पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. गेल्या ५ वर्षांत कोणतेही सत्ता किंवा पद नसतानाही शिवाजीराव पाटील यांनी केलेले समाजकार्य अत्यंत कौतुकास्पद असल्याचे नाभिक समाजाच्या नेत्यांनी सांगितले.
नाभिक समाजाच्या बांधवांनी एकमताने शिवाजीराव पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. "विकास करणाऱ्या शिवाभाऊंना पाठिंबा देऊन संपूर्ण समाज त्यांच्या सोबत उभा राहणार आहे," असे स्पष्ट केले.
शिवाजीराव पाटील हे गोरगरिबांच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव तत्पर असून, त्यांचा तळमळीचा प्रयत्न मतदारसंघाच्या विकासासाठी आहे. त्यामुळे नाभिक समाजाच्या या महत्त्वपूर्ण पाठिंब्यामुळे शिवाजीराव पाटील यांच्या विजयाच्या शक्यता अधिक उज्ज्वल झाल्या आहेत.

Post a Comment
0 Comments