Type Here to Get Search Results !

राजर्षी शाहू समविचारी आघाडीचा निर्धार: विकासासाठी महायुतीचा पराभव करणार

 राजर्षी शाहू समविचारी आघाडीचा निर्धार: विकासासाठी महायुतीचा पराभव करणार


राजर्षी शाहू समविचारी आघाडीचे उमेदवार विनायक ऊर्फ अप्पी पाटील यांनी महायुतीवर जोरदार टीका करत, जनतेचा विश्वासघात केल्याचा आरोप केला आहे. महायुतीचा पराभव निश्चित असून, समविचारी शक्तींनी एकत्र येत निवडणुकीत आघाडी विजय मिळवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


"धर्माध आणि जातीयवादी विचारसरणी असलेल्या महायुतीच्या उमेदवाराचा पराभव हा आमचा प्रमुख उद्देश आहे. मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही जनतेच्या विश्वासावरच मैदानात उतरलो आहोत," असे पाटील म्हणाले.


त्यांनी भाजप आणि महायुतीवर टीका करत सांगितले की, "या निवडणुकीत एक बाजूला धर्माध आणि जातीयवादी महायुतीचा उमेदवार आहे, तर दुसऱ्या बाजूला वारसदार म्हणून मत मागणारे महाविकास आघाडीचे उमेदवार. आम्ही जनतेला सक्षम पर्याय म्हणून राजर्षी शाहू समविचारी आघाडी स्थापन केली आहे."


आघाडीच्या अजेंड्यात पर्यावरणपूरक पर्यटन विकास आणि तरुणांना रोजगार देणारे उद्योग उभारणे हे प्रमुख मुद्दे आहेत. मतदारसंघातील सिंचन समस्या सोडवून बंद पाईपद्वारे वंचित भागांना पाणी उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योग उभारण्यावरही भर दिला जाईल.


शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात विशेष लक्ष देत, "जिल्हा परिषदेच्या शाळांचे अस्तित्व टिकवण्यासाठी विधानसभेत आवाज उठवू, आणि गरज पडल्यास जनआंदोलन उभारू," असा ठाम निर्धार पाटील यांनी व्यक्त केला.


राजर्षी शाहू समविचारी आघाडीचे स्वप्न: विकासासाठी एकजूट


Post a Comment

0 Comments