Type Here to Get Search Results !

चंदगडमध्ये अप्पी पाटील यांना प्रचंड पाठिंबा: विजय निश्चित

 चंदगडमध्ये अप्पी पाटील यांना प्रचंड पाठिंबा: विजय निश्चित


राजर्षी शाहू समविचारी आघाडीचे उमेदवार विनायक ऊर्फ अप्पी पाटील यांना चंदगड, आजरा आणि गडहिंग्लज या तीनही तालुक्यांमधून भरघोस पाठिंबा मिळत आहे. चंदगडमधील काँग्रेसचे नेते गोपाळराव पाटील, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रभाकर खांडेकर, बळीराजा संघटनेचे अध्यक्ष नितीन पाटील, जिल्हा परिषद सदस्य कल्लाप्पाण्णा भोगण यांचा त्यांना महत्त्वाचा आधार आहे.


तसेच आजरा येथून संविधान बचाव समितीचे समन्वयक कॉम्रेड संपत देसाई आणि संजय तर्डेकर यांचाही अप्पी पाटील यांना पाठिंबा असल्याने, या निवडणुकीत त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे.


अप्पी पाटील यांनी नेहमीच जनतेच्या हितासाठी आणि मतदारसंघाच्या विकासासाठी कार्य केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू समविचारी आघाडीने यावेळी पर्यावरणपूरक पर्यटन, सिंचनाच्या समस्यांचे निराकरण, आणि तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.


चंदगडच्या जनतेने अप्पी पाटील यांना पक्षापेक्षा माणूस म्हणून मान्यता दिली आहे. "राजकारणात कधीच कुणाचं मन दुखावलं नाही, म्हणूनच आम्ही सर्व जनता अप्पी पाटील यांच्या सोबत आहोत," असे मतदार उघडपणे व्यक्त करत आहेत. चिन्ह 🪣 बादली घेऊन अप्पी पाटील यांचा विजय निश्चित केला जाईल, असा विश्वास त्यांच्या समर्थकांमध्ये आहे.


Post a Comment

0 Comments