दि न्यू इंग्लिश स्कूलचे मतदान जनजागृती पथनाट्य
चंदगड, दि. 15: येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकशाहीची ताकद वाढवण्यासाठी चंदगडमधील द न्यू इंग्लिश स्कूलने अनोख्या पद्धतीने जनजागृती केली. विद्यार्थ्यांनी संभाजी चौक आणि कैलास कॉर्नर या प्रमुख ठिकाणी मतदान जनजागृती पथनाट्य सादर केले. मुख्याध्यापक एन.डी. देवळे यांच्या मार्गदर्शनाखाली संजय साबळे आणि बी. आर. चिगरे यांनी या उपक्रमाचे आयोजन केले.
पथनाट्यात कु. सुकन्या आनंदाचे, वैष्णवी तोरस्कर, श्रावणी कोपर्डे, संस्कृती वाके, आर्या मोहिते, संगीता यमकर, हर्षदा आणि उत्कर्षा भवारी, चिराग दुगानी, विशाल मांगले, युवराज हळवणकर, उत्कर्ष कुंभार, आणि कार्तिक निट्टूरकर यांनी उत्साहाने सहभाग घेतला.
गुरुवारचा बाजार असल्याने मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते, ज्यांच्यापर्यंत या विद्यार्थ्यांनी प्रभावीपणे मतदानाचे महत्त्व पोहोचवले.


Post a Comment
0 Comments