अपक्ष उमेदवार शिवाजीराव पाटील यांना विविध पक्षांचा जाहीर पाठिंबा ; पत्रकार परिषदेत पाठिंबा जाहीर
शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाउपप्रमुख दिवाकर पाटील व शिवसैनिक
चंदगड ; अपक्ष उमेदवार शिवाजीराव पाटील यांच्या प्रचारासाठी आयोजित पत्रकार परिषदेत विविध पक्षांचे नेते आणि पदाधिकारी एकत्र येत त्यांना जाहीर पाठिंबा दिला. या कार्यक्रमात शिवाजीराव पाटील यांनी आपल्या ध्येयधोरणांची मांडणी करत चंदगड मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाचे वचन दिले. यावेळी तालुका अध्यक्ष शांतारामबापू पाटील उपस्थित होते .
![]() |
| उध्दव ठाकरे शिवसेना गटाचे तालुका प्रमुख व पदाधिकारी |
विविध पक्षांचा पाठिंबा:
पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचे तालुका प्रमुख अनिल दळवी, लक्ष्मण मनवाडकर, विभाग प्रमुख एकनाथ वाके, उपतालुका प्रमुख विनोद पाटील, शिवसैनिक विशाल गायकवाड, संदीप पाटील, अशोक पाटील आणि निवृत्ती वाघ उपस्थित होते. याशिवाय शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख दिवाकर पाटील, उपतालुका प्रमुख सुधीर पाटील, OBC तालुका प्रमुख मारुती पाथउट आणि कामगार सेनेचे पुंडलिक पाटील यांनीही आपला पाठिंबा व्यक्त केला.
महत्त्वाच्या व्यक्तींची उपस्थिती: पत्रकार परिषदेत मनसेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले आणि माजी संचालक नामदेव कांबळे (गोकुळ दूध संघ, कोल्हापूर) यांनी शिवाजीराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला.
विकासाचा निर्धार: शिवाजीराव पाटील यांनी चंदगड मतदारसंघातील शेतकरी, महिलांचे सक्षमीकरण, बेरोजगारी, शिक्षण आणि आरोग्य या प्रमुख समस्यांवर काम करण्याची ग्वाही दिली. त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका करत विकास हेच आपले उद्दिष्ट असल्याचे स्पष्ट केले.
एकजूट दाखवत विजयाचा संकल्प: या परिषदेत उपस्थित पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येत शिवाजीराव पाटील यांना निवडून आणण्यासाठी एकजूट दाखवली आणि मतदारांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले .

Post a Comment
0 Comments