Type Here to Get Search Results !

भर पावसात शिवाजीराव पाटील विरोधकांवर बरसले

 भर पावसात शिवाजीराव पाटील विरोधकांवर बरसले; कीणी येथे सभेवेळी वरुणराजाची हजेरी हा विजयाचा संकेत

किणी येथे प्रचार सभेवेळी वरूणराजाची हजेरी ; विरोधकावर भाऊ गरजले  

चंदगड मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शिवाजीराव पाटील यांच्या कीणी येथील प्रचारसभेत वरुणराजानेही हजेरी लावल्याने सभा विशेष रंगतदार ठरली. सैनिक आणि तरुणांच्या बाईक रॅलीने गावात उत्साह निर्माण केला होता. शिवाजीराव पाटील यांनी पावसातच भर सभेत विरोधकांवर जोरदार टीका केली.

विरोधकांवर प्रहार:

शिवाजीराव पाटील यांनी कोणत्याही पदाविना केलेल्या विकासकामांचा दाखला देत, घराणेशाहीवर टीका केली. "सामान्य जनतेच्या वेदना घराणेशाहीवाल्यांना कळणार नाहीत," असे म्हणत त्यांनी लोकांना शेतकरी कुटुंबातील उमेदवाराला साथ देण्याचे आवाहन केले.

पावसात सभा, विजयाचा संकेत: पावसाला शुभ संकेत मानत, "पावसात भिजलं की सभा गाजते आणि विजयही पक्का होतो," असे आत्मविश्वासाने सांगत शिवाजीराव पाटील यांनी लोकांना विजयाचे आश्वासन दिले.


सैनिक व तरुणांची उत्स्फूर्त उपस्थिती: शिवाजीराव पाटील यांच्या प्रचारसभेला तरुण व सैनिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. भरमूअण्णा पाटील यांनीही पाटील यांच्या विकासकामांचे कौतुक करत, त्यांना बहुमताने निवडून देण्याचे आवाहन केले.


Post a Comment

0 Comments