आर. एम. चौगुले यांनी केले विजेत्या खेळाडूंचे जल्लोषात स्वागत
बंगळूर येथे सुरू असलेल्या मिनी ऑलिम्पिक खो-खो स्पर्धेत बेळगावातील मुलांच्या संघाने अंतिम फेरीत म्हैसूरला पराभूत करत विजेतेपद पटकाविले.
संघाचे आगमन बेळगाव रेल्वेस्थानकावर होताच महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा नेते आर. एम. चौगुले यांनी खेळाडूंचे जल्लोषात स्वागत केले. त्यांनी सर्व खेळाडूंना गुलाबपुष्प आणि पेढे देऊन अभिनंदन केले व अल्पोपहाराचे आयोजन केले.
आर. एम. चौगुले यांनी खेळाडूंच्या कौशल्याचे कौतुक करताना, "भविष्यात देशपातळीवर बेळगावचे नाव उंचावावे," अशा शुभेच्छा दिल्या.
बेळगावच्या संघाने बंगळूर, रायचूर आणि बागलकोटचा पराभव करत अंतिम फेरी गाठली होती. सोमवारी (ता. १८) झालेल्या अंतिम सामन्यात त्यांनी बलाढ्य म्हैसूर संघाचा १ गडी व ५ मिनिटे राखून दारुण पराभव केला.
संघातील सोहम भातकांडे याचा संपूर्ण स्पर्धेत शानदार खेळ झाला. याशिवाय श्री तरळे, राज भातकांडे, संकल्प सांबरेकर, वैभव भातकांडे, कार्तिक भातकांडे, वैभव गोरे, श्रीधर कटांबळे यांनी विजयात महत्त्वाचा वाटा उचलला.
प्रशिक्षण आणि प्रोत्साहन:
संघाला प्रशिक्षक प्रदीप भांदुर्गे आणि अरविंद मन्नोळकर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच बेळगाव जिल्हा अमेच्युअर खो-खो संघटनेचे सचिव नारायण पाटील, नितीन नाईक व अन्य पदाधिकाऱ्यांनी संघाला प्रोत्साहन दिले.
रवी पाटील
बेळगाव

Post a Comment
0 Comments