संधीचं सोन करून चंदगडच्या विकासाला गती देणार; जन आशीर्वाद यात्रेतून वाढता पाठिंबा
मानसिंग खोराटे यांना पाठिंबा देताना ग्रामस्थ
चंदगड (प्रतिनिधी) : चंदगड विधानसभेसाठी जनसुराज्य शक्ती पक्षाकडून उमेदवारी मिळणं ही माझ्या कामाची पोच पावती आहे. उद्योग क्षेत्रासह सामाजिक आणि दौलातच्या माध्यमातून आजपर्यंत केलेल्या कामामुळेच पक्षाचे अध्यक्ष विनय कोरे यांनी माझ्यावर विश्वास दाखवला असून त्याला पात्र राहून नक्कीच पुन्हा एकदा चंदगड मतदारसंघावर जनसुराज्यचा गुलाल उधळू असा ठाम विश्वास मानसिंग खोराटे यांनी व्यक्त केला. त्यांच्या जन आशीर्वाद यात्रेला गडहिंग्लज तालुक्यातून उदंड प्रतिसाद लाभत असून नेसरी परिसरातील मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी पक्षाच्या ध्येय धोरणांसह चंदगड विधानसभेचं व्हिजन खोराटे यांनी मांडले. त्याला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता विजय आपलाच असल्याचे ते म्हणाले.
विनय कोरे सावकर हे राज्यातील मात्तब्बर नेते असून त्यांच्याकडे विकासाची वेगळी दृष्टी आहे. त्यांनी सहकार, उद्योगसमूह आणि आमदारकीच्या माध्यमातून वारणा परिसराचा कायापालट केला आहे. त्याच धर्तीवर चंदगड मतदारसंघाचा विकास करून जिल्ह्यात एक आदर्श मॉडेल उभं करण्याचं आपलं ध्येय असल्याचे खोराटे यांनी यावेळी सांगितले. कोरे यांच्याशी आपले जुने ऋणानुबंध आहेत. त्यांची काम करण्याची पद्धत आणि विकासाचे धोरण यामुळे त्यांनी जनसुराज्य शक्ती पक्षाच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. वारणा उद्योग समूहाच्या माध्यमातून त्यांनी त्या परिसराला विकासाचं एक आदर्श मॉडेल बनवलं आहे. त्यांनी दिलेली संधी आणि मतदारसंघातील सामान्य मतदार बंधू-भगिनिंच्या पाठबळावर आपला विजय नक्की आहे. त्या माध्यमातून चंदगड मतदारसंघाचा उद्योग, रोजगार, पर्यटन, आरोग्य, शिक्षण आणि महिला सक्षमीकरण या सर्वच क्षेत्रात भरीव काम करण्याची संधी आहे. त्यामुळे चंदगडचं नंदनवन केल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याची भावना खोराटे यांनी व्यक्त केली .
वारणानगरच्या धर्तीवर चंदगडला विकासाचं मॉडेल बनवणार
जनसुराज्य पक्षाचे सर्वेसर्वा विनय कोरे यांनी वारणा उद्योग समूह आणि राजकीय इच्छाशक्तीच्या बळावर वारणानगर हे एक विकासाचं मॉडेल निर्माण केलं आहे. त्याठिकाणी सहकार, उद्योग, व्यवसाय, रोजगार, शिक्षण, आरोग्य अशा सर्वच सुविधा उपलब्ध आहेत. लोकांना चांगले जीवनमान दिलं गेले आहे. त्याच धर्तीवर चंदगड मतदारसंघात दौलत आणि इतर उद्योगांच्या माध्यमातून सर्वांगीण विकासाचे आदर्श मॉडेल बनवण्याचा संकल्प मानसिंग खोराटे यांनी व्यक्त केला. त्यासाठीचे आपल्याकडे व्हिजन असून विकासाचा आराखडा तयार आहे. केवळ राजकीय ताकद हवी असून ती तुमच्या मतदार बंधू भगिनींच्या हातात आहे. त्यामुळे तुमचे मतरुपी आशीर्वाद नारळाची बाग या चिन्हावर मिळावे असे आवाहन खोराटे यांनी केले.
Post a Comment
0 Comments