चंदगडच्या विकासाचे नवे पर्व –
डॉ. नंदाताई कुपेकर यांचा आमदारकीसाठी निर्धार
चंदगड मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाच्या अधिकृत उमेदवार म्हणून डॉ. नंदाताई कुपेकर - बाभूळकर यांनी निवडणूक रिंगणात उतरत अर्ज दाखल केला आहे. स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर, महाराष्ट्र विधानसभेचे माजी सभापती आणि चंदगड तालुक्याच्या विकासाचे शिल्पकार तसेच माजी आमदार स्व. संध्याताई कुपेकर यांच्या कन्या असलेल्या डॉ .नंदाताई कुपेकर यांनी आपल्या नेतृत्वात नवा जोम आणण्याचे वचन दिले आहे.
चंदगड, आजरा आणि गडहिंग्लज या भागात त्यांनी मोठ्या प्रमाणात दौरे करत मतदारांशी थेट संवाद साधण्याचा कार्यक्रम राबवला आहे. या दौर्यादरम्यान त्यांनी सर्वसामान्य जनतेच्या अडचणी आणि समस्या जाणून घेतल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा आणि पर्यटन यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्या कटाक्षाने लक्ष केंद्रित करत आहेत.
"चंदगड मतदारसंघातील जनतेच्या विकासाचे स्वप्न साकार करण्यासाठी मी सज्ज आहे. तुमच्या आशीर्वादाने निवडून आल्यास या भागातील सर्व प्रश्नांचा सखोल विचार करून त्यावर ठोस उपाययोजना करण्यात येईल. शिक्षण, आरोग्य, पर्यटन, रोजगार आणि पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी कटिबद्ध आहे," असे आश्वासन त्यांनी जनतेला दिले आहे.
डॉ.नंदाताई कुपेकर यांची पदवीधर असलेल्या नेतृत्वाची पार्श्वभूमी आणि त्यांचा जनतेशी असलेला जवळचा संवाद पाहता मतदारांमध्ये एक विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या जनसंपर्क दौऱ्याला मोठा प्रतिसाद मिळत असून, चंदगडच्या जनतेने त्यांना ‘विकासाचा नवा चेहरा’ म्हणून स्वीकारले आहे.
डॉ. नंदाताई कुपेकर यांचा हा उत्साही आणि आश्वासक प्रचार चंदगड मतदारसंघाच्या विकासासाठी नवा अध्याय घडवू शकतो, असा विश्वास त्यांनी मतदारांना दिला आहे.

Post a Comment
0 Comments