चंदगड विधानसभा मतदारसंघात अप्पी पाटील यांचा आजचा गावभेट दौरा
राजर्षी शाहू समविचारी आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री. अप्पी ऊर्फ विनायक विरगोंडा पाटील यांच्या नेतृत्वाखाली चंदगड विधानसभा मतदारसंघात जोरदार प्रचाराला सुरुवात झाली आहे. बादली चिन्ह घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले अप्पी पाटील शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2024 रोजी विविध गावांना भेटी देणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, गावागावातून त्यांना पाठिंबा मिळत आहे.
दौऱ्याची सुरुवात सकाळी 9 वाजता लाकूडवाडी येथून होणार असून, दिवसभरात ते सुळे, हारूर, गजरगाव, चाफवडे, कोवाडे, निंगुडगे, मालिग्रे, हमदेवाडी, कोळिन्द्रे, पोळगाव आणि अनेक गावांना भेट देणार आहेत.
संध्याकाळी 4 वाजल्यापासून किणे, शिरसंगी, वाटांगी, मोरेवाडी, चितळे, भावेवाडी, आणि जेऊर अशा गावांमध्ये ते थेट जनतेशी संवाद साधणार आहेत.
अप्पी पाटील यांचा हा दौरा गावागावात जोरदार चर्चेत असून, मतदारांनी त्यांच्या विकासात्मक अजेंड्याला उत्स्फूर्त पाठिंबा दर्शवला आहे.

Post a Comment
0 Comments