Type Here to Get Search Results !

शिवाजीराव पाटील यांना मुगळी, कानूर, नंदनवाड, शिरोली, कालकुंद्री आदी ग्रामस्थांचा जाहीर पाठिंबा

 शिवाजीराव पाटील यांना मुगळी, कानूर, नंदनवाड, शिरोली, कालकुंद्री आदी ग्रामस्थांचा जाहीर पाठिंबा


सावर्डे : चंदगड मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शिवाजीराव पाटील यांना मुगळी, कानूर, नंदनवाड, शिरोली, कालकुंद्री आदी गावांतील ग्रामस्थांनी सावर्डे येथील प्रचार कार्यालयात जाहीर पाठिंबा दिला आहे. या पाठिंबा बैठकीसाठी चंदगड मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी दिवसभर गाठीभेटी घेतल्या आणि शिवाजीराव पाटील यांना विजयी करण्याचा दृढ निर्धार व्यक्त केला.



ग्रामस्थांचा वाढता पाठिंबा आणि पाटील यांच्या समाजकार्यामुळे निवडणुकीत त्यांची ताकद अधिक मजबूत झाली आहे. पाटील यांच्या विकासात्मक कार्याचे आणि जनसेवेचे ग्रामस्थांनी विशेष कौतुक केले. सर्वांनी एकत्रितपणे शिवाजीराव पाटील यांना मोठ्या मतांनी विजयी करण्याचा संकल्प केला.


या कार्यक्रमात शिवाजीराव पाटील यांनी महायुतीचे उमेदवार राजेश पाटील आणि मानसिंग खोराटे यांच्यावर टीका करत, "घराणेशाही पेक्षा शेतकऱ्याच्या पोराला विजय करा," असे आवाहन केले. शिवाजीराव पाटील यांनी विकास आणि सामान्यांच्या हक्कांसाठी लढा देण्याची ग्वाही देत, जनतेचा विश्वास कायम जिंकण्याचे आश्वासन दिले.


Post a Comment

0 Comments