Type Here to Get Search Results !

हलकर्णी भागात शिवाजीराव पाटील यांना महिलांचा वाढता पाठिंबा; विजयासाठी घराघरात प्रचार

 हलकर्णी भागात शिवाजीराव पाटील यांना महिलांचा वाढता पाठिंबा; विजयासाठी घराघरात प्रचार

 शिवाजीराव पाटील यांना हलकर्णी भागात पाठिंबा 

हलकर्णी : चंदगड विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शिवाजीराव पाटील यांचा प्रचार सध्या जोरात सुरू असून, हलकर्णी परिसरात त्यांना विशेषत: महिलांकडून मोठा पाठिंबा मिळत आहे. लाडक्या भावाच्या विजयासाठी महिलांनी संपूर्ण ताकद लावली असून, घराघरात जाऊन प्रचार करण्याचा निर्धार केला आहे. शिवाजीराव पाटील हे अडीअडचणीच्या काळात लोकांना मदत करणारे, स्वखर्चातून कामं मार्गी लावणारे नेते म्हणून ओळखले जातात, आणि याचमुळे त्यांच्या कार्याची दखल घेऊन महिलांसह मतदार त्यांना प्रचंड समर्थन देत आहेत.

प्रचाराच्या या मोहिमेत सामाजिक कार्यकर्ते डॉ. गंगाधर व्हसकोटी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची फळी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. डॉ. व्हसकोटी यांनी हलकर्णी जिल्हा परिषद मतदारसंघासह चंदगड विधानसभेच्या विविध भागात प्रचार यंत्रणा उभारली आहे. गरीब आणि गरजू लोकांना नेहमी मदतीचा हात देणारे डॉ. व्हसकोटी, त्यांच्या कार्यकर्त्यांच्या साथीत शिवाजीराव पाटील यांचा प्रचार आणखी वेगाने वाढत आहे.

शिवाजीराव पाटील यांनी मतदारसंघातील विविध गावांना भेटी देऊन लोकांशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. प्रत्येक गावात महिलांसह सर्वसामान्य मतदार शिवाजीराव पाटील यांना प्रचंड पाठिंबा देत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखालील टीमने या निवडणुकीत शिवाजीराव पाटील यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार केला आहे.

डॉ. गंगाधर व्हसकोटी यांच्या सक्रिय सहभागामुळे शिवाजीराव पाटील यांचा प्रचार मोहीम आणखी प्रभावी ठरत आहे.


Post a Comment

0 Comments