मुंबईकरांचा निर्धार . . !
चंदगड मतदारसंघाचे नवे कर्णधार शिवाजीभाऊ पाटील
ठाणे (प्रतिनिधी ) : मुंबई आणि ठाणे येथे स्थायिक असलेल्या चंदगड मतदारसंघातील नागरिकांनी सांस्कृतिक स्नेहमेळावा आयोजित केला, ज्यात चंदगडचे अपक्ष उमेदवार शिवाजीराव पाटील यांचा मोठ्या उत्साहात सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात उपस्थितांनी पाटील यांना आगामी निवडणुकीत विजय मिळवून देण्यासाठी ठाम पाठिंबा दर्शवला.
शिवाजीराव पाटील यांनी आपल्या भाषणात चंदगडच्या विकासासाठी असलेली वचनबद्धता व्यक्त केली आणि त्यांच्या निस्वार्थी समाजसेवेचे आश्वासन दिले. यावेळी मुंबई आणि ठाणेकर मतदारांनी "पाण्याची टाकी" या चिन्हावर बटन दाबून त्यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचा निर्धार केला.
"मुंबईकरांचा एकच निर्धार, आता शिवाजीभाऊंच असतील चंदगड मतदारसंघाचे नवे कर्णधार," असे म्हणत त्यांनी पाटील यांच्या नेतृत्वाखाली चंदगडच्या उज्ज्वल भवितव्यासाठी एकजूट दाखवली.

Post a Comment
0 Comments