नवनियुक्त शिक्षक प्रशिक्षण केंद्राला डायटचे अधिव्याख्याता टी. एम.कुंभार यांची भेट
चंदगड: राज्य शिक्षण व प्रशिक्षण संस्था, पुणे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, कोल्हापूर आणि पंचायत समिती चंदगड यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, हलकर्णी येथे आयोजित नवनियुक्त शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम मोठ्या उत्साहात सुरू आहे.
यावेळी कोल्हापूर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे (DIET) आधिव्याख्याता टी.एम. कुंभार यांनी भेट देऊन नवनियुक्त शिक्षकांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्याचबरोबर चंदगड पंचायत समितीचे शिक्षण अधिकारी सुभाष बिरंजे यांनी शिक्षकांच्या भूमिकेचे महत्त्व अधोरेखित केले .
कुंभार सरांनी आपल्या विनोदी आणि विचारप्रवर्तक शैलीत शिक्षकांना अध्यापनाचे महत्त्व समजावून सांगितले. त्यांनी शिक्षकांनी आव्हाने स्विकारणारी, जिज्ञासावृत्ती जागवणारी आणि विद्यार्थ्यांना योग्य दिशा देणारी भूमिका निभावावी, असे प्रतिपादन केले. विविध छंद जोपासण्याची आणि वाचनसंस्कृती वाढवण्याची गरजही त्यांनी सांगितली.
कुंभार सरांनी शिक्षकांच्या जबाबदारीवर भर देत, शिक्षक हा समाजाचा शिल्पकार असून त्याच्या हातून विद्यार्थ्यांचे भविष्य घडते, असे सांगितले.
बीआरसी तज्ञ प्रशिक्षण समन्वयक श्री. सुनिल पाटील आणि भाऊ देसाई यांनी मान्यवरांचा सत्कार केला. सुलभक रवींद्र पाटील यांनी कुंभार सरांचे गुणगान करणारे काव्यगीत सादर केले. कार्यक्रमात 89 नवनियुक्त शिक्षकांनी सहभाग घेतला.
सूत्रसंचालन महादेव साळवे यांनी केले, तर आभार प्रदर्शन संजय साबळे यांनी केले.

Post a Comment
0 Comments