अपक्ष उमेदवार शिवाजीराव पाटील यांना कुरणीतील महिला व युवकांचा पाठिंबा
कुरणी येथील महिलांचा शिवाजीराव पाटील यांना पाठिंबा
कुरणी, चंदगड: चंदगड मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शिवाजीराव पाटील यांना कुरणी येथील ग्रामस्थ, युवक, आणि महिलांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला आहे. श्री रळनाथ महिला भजनी मंडळाच्या प्रमुख आणि सदस्यांसह तसेच युवक मंडळाने शिवाजीराव पाटील यांची कार्यालयात सदिच्छा भेट घेऊन त्यांना पाठिंबा दर्शविला.
महिला भजनी मंडळाचा सक्रिय सहभाग
श्री रळनाथ महिला भजनी मंडळाच्या मेघा अनिल जाधव, वनिता विजय गावडे, अनिता अर्जुन पाटील, अर्चना अनंत केरकर, निता ज्ञानेश्वर केरकर, आणि चांगुणा शिवाजी गावडे यांनी शिवाजीराव पाटील यांच्याशी भेट घेऊन त्यांना चंदगड मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी पाठिंबा दिला. महिलांनी समाजातील योगदानावर चर्चा केली आणि पाटील यांच्या नेतृत्त्वावर विश्वास व्यक्त केला .
युवक मंडळातील प्रमुख सदस्य राजेंद्र जोतिबा गावडे, अनंत तानाजी केरकर, अशोक पावणोजी गावडे, संतोष रवळू पाटील, ठाणू रघुनाथ पाटील, रविंद्र लाड, विठ्ठल पाटील, अनिकेत पाटील, गणपत पाटील, आणि प्रकाश केरकर यांनी एकत्रितपणे शिवाजीराव पाटील यांना समर्थन देण्याचा निर्धार केला. त्यांच्या नेतृत्वाखालील कार्यात ग्रामीण विकास, शिक्षण, आणि युवक सक्षमीकरणाला विशेष महत्त्व दिले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शिवाजीराव पाटील यांनी कुरणीतील युवक आणि महिलांना धन्यवाद देत त्यांचा पाठिंबा महत्त्वाचा असल्याचे सांगितले. त्यांनी समाजासाठी सतत कार्यरत राहण्याचे आश्वासन दिले आणि चंदगड मतदारसंघाच्या विकासासाठी युवकांच्या योगदानाची भूमिका निर्णायक ठरेल, असे प्रतिपादन केले.
गावकऱ्यांचा ठाम निर्धार
कुरणीतील ग्रामस्थ, युवक, आणि महिलांनी शिवाजीराव पाटील यांच्याशी एकजुटीने काम करण्याचा निर्धार केला आहे. या पाठिंब्यामुळे चंदगड मतदारसंघातील निवडणूक वातावरण तापत असून पाटील यांचा विजय निश्चित असल्याची भावना व्यक्त केली जात आहे .
Post a Comment
0 Comments