Type Here to Get Search Results !

कोल्हापूर येथे डॉ.आनंद पाटील –संकपाळ दांपत्याचा आमदार डॉ. एम. जी. मुळे यांच्या हस्ते सत्कार

 कोल्हापूर येथे डॉ.आनंद पाटील –संकपाळ दांपत्याचा आमदार डॉ. एम. जी. मुळे यांच्या हस्ते सत्कार


कोल्हापूर | दि. २५ मे – सुप्रसिद्ध तुलनात्मक साहित्याचे अभ्यासक व लेखक डॉ. आनंद पाटील – संकपाळ आणि त्यांच्या पत्नी सौ. गीता पाटील यांचा घरगुती सत्कार कर्नाटक विधानसभेचे आमदार डॉ. एम. जी. मुळे यांच्या हस्ते डॉ. पाटील यांच्या निवासस्थानी संपन्न झाला.


या वेळी विठ्ठलराव वाघमोडे (निपाणी) आणि जनार्दन पाटील (दिल्ली) हेही उपस्थित होते. डॉ. मुळे यांनी “महाराष्ट्राला माहीत नसलेले सम्राट शिवाजी” हे पुस्तक वाचून, सम्राट शहाजी भोसले यांच्यावरही असाच अभ्यासपूर्ण ग्रंथ लिहावा, असा प्रस्ताव काही वर्षांपूर्वी डॉ. पाटील यांना दिला होता. त्यानुसार “मराठा साम्राज्य सूर्य : वजीर शहाजी भोसले” हा ग्रंथ शिवसंत संजय मोरे यांच्या हस्ते बेळगावात प्रकाशीत झाला. पुण्याच्या न्यू ईरा पब्लिशिंग हाऊसने या ग्रंथाला बेस्ट सेलर ठरण्याची शक्यता असल्याचे सांगितले आहे.


डॉ. मुळे यांनी स्वतः हे पुस्तक वाचले असून, मराठीत अशी सप्रमाण, संशोधनाधिष्ठित जीवनकथा फारशी आढळत नसल्याचे स्पष्ट केले. यानिमित्ताने कर्नाटकात सम्राट शहाजींची स्मारके अधिक प्रगत रूपात उभारावीत, यासाठी इंग्रजी पत्रव्यवहाराच्या अनुषंगानेही चर्चा झाली. “खरे सम्राट शहाजी कोण होते, हे या ग्रंथामुळेच कळले,” असे मत डॉ. मुळे यांनी व्यक्त केले.


यावेळी बोलताना डॉ. मुळे म्हणाले, “हा ग्रंथ कन्नड भाषेत ‘पाटलाची लंडन वारी’ प्रमाणे लोकप्रिय होईल, अशी मला खात्री आहे,” असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

Post a Comment

0 Comments