गौरव गुणवंतांचा, सन्मान शिक्षकांचा आणि आदर पालकांचा
चंदगड तालुका मराठी अध्यापक संघाची नियोजन बैठक
चंदगड तालुका मराठी अध्यापक संघाच्या वतीने एस.एस.सी. बोर्ड परीक्षेत मराठी विषयात ९५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव, त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचा सन्मान आणि विद्यार्थ्यांच्या पालकांचा आदर करण्यासाठी नियोजन बैठक 'मुक्तछंद ' कारवे येथे आयोजित करण्यात आली.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी तालुका मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष मोहन पाटील होते. सचिव एस. पी. पाटील, खजिनदार व्ही.एल. सुतार, कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी एम. एन. शिवणगेकर, जिल्हा प्रतिनिधी संजय साबळे आणि तालुका समन्वयक रवींद्र पाटील यांची उपस्थिती होती.
या बैठकीत विविध स्तरांवर मराठी विषयाच्या गुणवत्तेचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच शिक्षक आणि पालकांचा यथोचित सन्मान करण्याचे एकमताने ठरविण्यात आले आहे. याबाबतची माहिती संघाचे अध्यक्ष मोहन पाटील यांनी दिली.
चंदगड तालुका मराठी अध्यापक संघ हा वर्षभर विद्यार्थ्यांच्या भाषिक प्रगतीसाठी विविध उपक्रम राबवत असतो. त्या परंपरेनुसार यावर्षीही हे सन्मान समारंभाचे आयोजन शनिवार दिनांक ७ जून २०२५ रोजी सकाळी १० वाजता घेण्यात येणार आहे.
तरी संबंधीत शिक्षक व विद्यार्थ्यांनी आपल्या गुणपत्रकाची झेरॉक्स एच. आर . पाऊसकर यांच्या 9420460041 या व्हाट्सअप क्रमांकावर दि.31 मे 2025 रोजी पर्यंत पाठवावे असे आवाहन तालुका समन्वक रवींद्र पाटील यांनी केले आहे .
हा एक प्रेरणादायी सोहळा ठरेल, असा विश्वास मराठी अध्यापक संघाने व्यक्त केला आहे.

Post a Comment
0 Comments