विलास पवार यांना मातृशोक..
अनुसया रामचंद्र पवार यांचे वृद्धापकाळने निधन
बेळगाव :- श्रीमती अनुसया रामचंद्र पवार वय वर्षे 93 राहणार खडक गल्ली बेळगाव यांचे आज सकाळी नऊच्या सुमारास वृद्धापकाळन दुःखद निधन झालं.
त्या खूप श्रद्धाळू आणि धार्मिक होत्या... त्या सामाजिक कार्यात कायम अग्रेसर असायच्या.... त्यांचा स्वभाव मनमिळावू आणि शांतता प्रिय होता. त्यांच्या पश्चात दोन कर्ते चिरंजीव, तीन विवाहित कन्या, जावई, सुना, नातवंडे पणतवंडे असा खूप मोठा परिवार आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते श्री विलास पवार यांच्या मातोश्री होत. त्यांची अंत्यविधी आज दुपारी 2.00 वाजता सदाशिवनगर स्मशान भूमी मध्ये होणार आहे.
रक्षाविसर्जन गुरुवार दिनांक 29 रोजी सकाळी आठ वाजता सदाशिवनगर स्मशानभूमी मध्ये होणार आहे...

Post a Comment
0 Comments