महादेवराव वांद्रे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कॉलेज, तुर्केवाडी येथे अलविदा सोहळा
चंदगड (प्रतिनिधी) – महादेवराव वांद्रे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कॉलेज, तुर्केवाडी येथे सन 2022 ते 2025 या शैक्षणिक वर्षातील अंतिम वर्षातील उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा भावनिक निरोप समारंभ आज उत्साहात पार पडला. महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांतून शिक्षणासाठी येथे दाखल झालेले विद्यार्थी आपल्या पालकांसह उपस्थित होते.
या प्रसंगी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात घालवलेल्या सुंदर आठवणींना उजाळा देत आपल्या भावना व्यक्त केल्या. इथे शिक्षण चांगल्या प्रकारे दिले जाते आम्ही बाहेरून आलो तरी "हे कॉलेज आमचं दुसरं घर होतं," अशा शब्दांत अनेक विद्यार्थ्यांनी मनोगत मांडत शिक्षक, शिक्षणपद्धती व संस्कारक्षम वातावरणाचे कौतुक केले. विद्यार्थिनींनीही आपल्या ऋणातीत भावना मोकळेपणाने व्यक्त करत महाविद्यालयाच्या आठवणी कायम स्मरणात राहतील, असे सांगितले.
पालकांनी महाविद्यालयाच्या गुणवत्ता शिक्षणाबद्दल समाधान व्यक्त करून महादेवराव वांद्रे व संपूर्ण शिक्षकवृंदाचे मन:पूर्वक आभार मानले. त्यांनी विद्यार्थ्यांवर घेतलेली मेहनत, दिलेली दिशा आणि घडवलेले व्यक्तिमत्त्व याची स्तुती केली.
या प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. महादेवराव वांद्रे सर यांनी विद्यार्थ्यांना उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. "शिक्षण ही केवळ डिग्री नसून तुमच्या जीवनाची दिशा आहे. समाजात काही तरी चांगले निर्माण करा," असे प्रेरणादायी शब्द त्यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितले. उपस्थित शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व स्टाफतर्फे विद्यार्थ्यांना अलविदा देण्यात आला.
कार्यक्रमाने महाविद्यालयातील एक सोहळा, एक टप्पा पूर्ण केला आणि विद्यार्थ्यांच्या नव्या प्रवासाची सुरुवात झाली. या प्रसंगी कॉलेज प्रांगणात भावनांचा ओघ अनुभवायला मिळाला.


Post a Comment
0 Comments