मराठा मंडळ चव्हाट गल्ली बेळगाव, येथे पालक मेळावा उत्साहात साजरा
बेळगाव : मराठा मंडळ हायस्कूल बेळगाव येथे 2025 - 26 चा शैक्षणिक वर्षाचा पालक मेळावा नुकताच शाळेच्या भातकांडे सभागृहात उत्साहात संपन्न झाला...
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली. विद्यार्थिनीच्या इशस्तवन व स्वागत गीताने वातावरण भक्तीमय व प्रेरणादायी झाले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री एम .के पाटील सर होते. प्रमुख अतिथी म्हणून शाळेच्या माजी उपप्राचार्य श्रीमती एल.जी.पाटील मॅडम होत्या. तर पालक प्रतिनिधी म्हणून सुनील भरमा पाटील व सौ आरती सुभाष गवी, ज्येष्ठ शिक्षक एम एस संभाजीचे सर, जी बी पाटील सर ,व जे एल पाटील सर व्यासपीठावर विराजमान होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. श्वेता जाधव मॅडम यांनी केले तर पाहुण्यांची ओळख श्री जे एल पाटील सर यांनी केली. श्रीमती एल.जी. पाटील यांनी पालकांना व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की आपल्यात प्रामाणिकपणा ,ध्येय, चिकाटी असली की आपण कोणत्याही कठीण परिस्थितीवर मात करून यश नक्की मिळवू शकतो . याची अनेक उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. पालक प्रतिनिधी म्हणून सुनील भरमा पाटील यांनी लहान वयातच मुलांना लागणाऱ्या व्यसनापासून दूर राहण्यास सांगून शिक्षकांच्या मदतीने अभ्यासातील अडचणी दूर करा असे मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमात शिक्षकांचे प्रतिनिधित्व करताना श्री जी बी पाटील सर यांनी मुलांना व पालकांना शाळेची शिस्त शाळेचे नियम ,वेळेचे नियोजन ,अटी मुलांच्या संगती, याचे अनेक उदाहरणे देऊन मुलांना मार्गदर्शन केले. अध्यक्ष समारोपात बोलताना श्री एम के पाटील सर म्हणाले मुलांनी अभ्यासाबरोबरच शाळेची शिस्त पाळली पाहिजे. थोरामोठ्यांचा आदर केला पाहिजेत.. असे म्हणत 2024 25 या वर्षात शाळेच्या पहिला आलेल्या पाच विद्यार्थ्यांचा शाल श्रीफळ आणि बक्षीस देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन के. एस. मोरे मॅडम आणि आभार आर. पी .ठक मॅडम यांनी केले.

Post a Comment
0 Comments