Type Here to Get Search Results !

मित्रांच्या आठवणींना सामाजिकतेची जोड – ‘उगम फाउंडेशन’चा प्रेरणादायी उपक्रम

 


मित्रांच्या आठवणींना सामाजिकतेची जोड – ‘उगम फाउंडेशन’चा प्रेरणादायी उपक्रम

दि न्यू इंग्लिश स्कूल मध्ये ३० विद्यार्थ्यांना लाभ

चंदगड –"उगम फाउंडेशन – एक हात मदतीचा" या सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या उपक्रमांतर्गत इयत्ता १० वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व गरीब, होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.


हा उपक्रम स्व. कै. रोहित राजाराम गायचारे, कै. नितीन नागेश, कै. मोरे, कै. विठ्ठल सुरेश नाईक, कै. रोहिणी लक्ष्मण गावडे, कै. दीपक कृष्णा भिरोडकर आणि कै. योगेश चौगुले या दिवंगत मित्रांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी त्यांच्या मित्रमंडळींनी एकत्र येत आयोजित केला होता. या उपक्रमात खऱ्या अर्थाने मित्रत्वाचे मूर्तिमंत दर्शन घडले.


या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दि न्यू इंग्लिश स्कूलचे प्राचार्य आर. पी. पाटील होते. त्यांनी आपल्या मनोगतात म्हटले की, “जीवनात काही व्यक्ती आपल्यातून जातात, मात्र त्यांच्या आठवणी आपल्या मनात कायम घर करून राहतात. त्या आठवणींचा सन्मान अशा सामाजिक कार्यातून जपला जातो, तेव्हा ते खरेच प्रेरणादायी ठरते.”


कार्यक्रमात यश देसाई, विनायक कळमकर, समृद्धी वाके, श्रावणी कोपर्डे यांनी मनोगत व्यक्त करत स्मृतींच्या सुरावटींना आवाज दिला.


या कार्यक्रमासाठी उपप्राचार्य व्ही. एन. कांबळे, टी. व्ही. खंडाळे, वर्षा पाटील, विद्या डोंगरे, वर्षाराणी बुरुड, ओंकार पाटील, रविंद्र कांबळे यांची उपस्थिती लाभली.


कार्यक्रमाचे आयोजन उमेद संस्थेचे सौरभ पाटील, प्रसाद देशपांडे, नागेश मुळीक, ओंकार पाटील, योगेश दळवी, लतीकेश देसाई, महेश पाठक, प्रबुद्ध शिरसाट यांनी केले.


सुत्रसंचालन संजय साबळे यांनी तर आभार प्रदर्शन सुहास रेडेकर यांनी केले.


हा उपक्रम केवळ एक सामाजिक मदतीचा नव्हे, तर मैत्री, स्मरण आणि उदात्ततेचा दिवा उजळवणारा ठरला.

Post a Comment

0 Comments