सोलापूर जिल्हा मराठी अध्यापक संघाची कार्यकारणी जाहीर
जिल्हा अध्यक्षपदी राजेंद्र आसबे तर जिल्हा सचिवपदी शशिकांत उपासे यांची निवड
सोलापूर, दि. 28 - महाराष्ट्र राज्य मराठी शिक्षक संघ अंकित सोलापूर जिल्हा माध्यमिक मराठी अध्यापक संघाची नूतन जिल्हा कार्यकारणी प्राचार्य डॉ. गणेश देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली सोलापुरातील सम्राट चौक येथील रा.स.चंडक प्रशालेत आयोजित केलेल्या सभेत जाहीर करण्यात आली.
प्रारंभी महाराष्ट्र राज्य मराठी शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी प्राचार्य डॉ. गणेश देशपांडे तसेच डॉ. देविदास गुरव कार्यवाहकपदी तर डॉ. रामचंद्र धर्मसाले यांची सहकार्यवाहपदी निवड झाल्याबद्दल सोलापूर जिल्हा मराठी अध्यापक संघाच्यावतीने तिघांचा सत्कार करण्यात आला.
यानंतर रिक्त झालेल्या पदावर खालील शिक्षकांची पदाधिकारी म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली....यामध्ये.... सोलापूर जिल्हा माध्यमिक मराठी शिक्षक संघाच्या जिल्हाध्यक्षपदी राजेंद्र आसबे (पंढरपूर), जिल्हा उपाध्यक्षपदी राजेंद्र माळी(मंगळवेढा) व सुभाष भिमनवरु(दक्षिण सोलापूर), जिल्हा सचिवपदी शशिकांत उपासे(दक्षिण सोलापूर), जिल्हा सहसचिवपदी रंगसिद्ध कोरे (मोहोळ), जिल्हा कोषाध्यक्षपदी शिवाजी कौलगे(पंढरपूर) तर प्रसिद्धी विभाग प्रमुख म्हणून रवी देवकर(सोलापूर शहर) यांची निवड करण्यात आली. तसेच जिल्हा कार्यकारणी सदस्यपदी महेश तांबुळकर, अमोगसिद्ध देशमुख, मिनेशकुमार टोणपे, संगप्पा आळगी, दयानंद चिकणे, सुनील बनसोडे, गुळवे मॅडम, उज्वला साळुंखे, वैशाली अघोर, ढगे मॅडम, मुस्ताक शेख यांची निवड करण्यात आली.
या सभेत मराठी भाषा आणखीन समृद्ध करण्यासाठी विविध उपक्रम, चर्चासत्रे, त्रैमासिक, वार्षिक वर्गणी, परीक्षेचे आयोजन, वक्तृत्व व निबंध स्पर्धा, शिक्षक उदबोधन प्रशिक्षण यासह विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ते बरोबरच मराठी भाषा शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यात येतील अशा विषयाच्या अनुषंगाने नियोजन करण्यासंदर्भात चर्चा झाली. उपस्थित राज्य व जिल्हा पदाधिकारी यांनी सोलापूर जिल्हा मराठी अध्यापक संघात मराठी विषय शिक्षक सदस्यांची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत... अशा सूचना मांडल्या.

Post a Comment
0 Comments