राकसकोपच्या सुपुत्राचा गौरव!
मोहन कल्लोजी पाटील यांची मराठा मंडळ हायस्कूल, बेळगाव येथे मुख्याध्यापकपदी निवड - गावकऱ्यांचा अभिमान
राकसकोप (प्रतिनिधी) – राकसकोप गावचे सुपुत्र व मराठा मंडळ संस्थेमध्ये कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष शिक्षक मोहन कल्लोजी पाटील यांची नुकतीच मराठा मंडळ हायस्कूल, बेळगाव येथे मुख्याध्यापकपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल गावातील मित्रपरिवाराने भेट देत संस्थेत जाऊन त्यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व त्यांच्या पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
या कौतुक सोहळ्यावेळी "एक दिवस गावासाठी" या उपक्रमाचे सदस्य शंकर बाबुराव कंग्राळकर, शिवसंत संजय रुक्माना मोरे व निवृत्त सुभेदार मेजर केदारी रामू मोटर विशेषतः उपस्थित होते. मराठा मंडळ हायस्कूलचे सहशिक्षकवृंद, कर्मचारी वर्ग तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना मुख्याध्यापक मोहन कल्लोजी पाटील यांनी मनःपूर्वक आभार व्यक्त करत सांगितले की, “गावकऱ्यांनी दिलेली ही साथ व शुभेच्छा मला प्रेरणा देणाऱ्या ठरतील. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व शाळेच्या प्रगतीसाठी मी सदैव कार्यरत राहीन.”
कार्यक्रम प्रसंगी विद्यालयात आनंदोत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते. गावातील सुपुत्राच्या या यशाने राकसकोप गावाचा नावलौकिक अजूनच वाढविला आहे.

Post a Comment
0 Comments