Type Here to Get Search Results !

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी दत्तात्रय भोंगळे

 अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी दत्तात्रय भोंगळे ; महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी सुनील लोणकर यांची निवड 

राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.शरद गोरे यांची माहिती


पुणे- साहित्य क्षेत्रातील अग्रणी असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी पुरंदर तालुका पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष मा.दत्तात्रय भोंगळे तर महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी पुणे जिल्हा पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष मा.सुनील लोणकर यांची निवड करण्यात आली,श्री भोंगळे यांनी गेली अनेक वर्षे साहित्य परिषदेचे प्रसिद्धीप्रमुख म्हणून उत्तम साहित्य सेवा बजावली आहे .


 तर श्री लोणकर यांनी साहित्य परिषदेचे पुणे जिल्हाध्यक्ष म्हणून उत्कृष्ट कार्य केले आहे, महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन व छत्रपती संभाजी महाराज मराठी साहित्य संमेलन उभारणीत या दोघांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे .


सासवड येथे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.शरद गोरे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले, यावेळी साहित्य परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश संघटक सचिव अमोल कुंभार,संदीपआप्पा जगताप,सुनीलतात्या कुंजीर,आदीजण उपस्थित होते .

Post a Comment

0 Comments