Type Here to Get Search Results !

तंजावरचे श्रीमंत युवराज संभाजीराजे भोसले तामिळनाडू प्रदेशाध्यक्षपदी निवड

 अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद

तंजावरचे श्रीमंत युवराज संभाजीराजे भोसले तामिळनाडू प्रदेशाध्यक्षपदी!


तंजावर (तामिळनाडू)

छत्रपती शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू श्रीमंत व्यंकुजीराजे भोसले यांचे थेट १३वे वंशज, आणि तंजावरचा मराठी तेजस्वी वारसा पुढे नेणारे युवराज! मराठी सांस्कृतिक परंपरेचे उज्ज्वल प्रतीक श्रीमंत युवराज संभाजीराजे भोसले यांची अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या तामिळनाडू प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या गौरवपूर्ण नियुक्तीचे पत्र अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरद गोरे यांच्या हस्ते देण्यात आले.


मराठी, तमिळ, कन्नड, तेलगू, हिंदी आणि इंग्रजी या अनेक भाषांवर प्रभुत्व असलेले युवराज संभाजीराजे हे तंजावरच्या श्रीमंत परंपरेचे आधुनिक शिलेदार आहेत. साहित्य, संस्कृती आणि इतिहास यांचा संगम असलेल्या तंजावरच्या राजवाड्यातील सरस्वती ग्रंथालय ही त्यांच्या वंशाच्या विद्वत्ता परंपरेची साक्ष आहे.


श्रीमंत छत्रपती सरफोजीराजे दुसरे यांनी याच तंजावर भूमीत बहुभाषिक नाट्यलेखन, ग्रंथसंपदा आणि सांस्कृतिक जतनाचा लौकिक मिळवला होता. या परंपरेचा वारसा पुढे नेत युवराज संभाजीराजे यांनी सांगितले, "भाषा व संस्कृतीचे संवर्धन हे काळाची गरज आहे. साहित्य हे नव्या पिढीला प्रेरणा देणारे प्रभावी माध्यम ठरते."


युवराज संभाजीराजे यांच्या निवडीचे स्वागत तंजावरसह संपूर्ण महाराष्ट्रात, आणि साहित्यप्रेमी मंडळींतून भरभरून होत आहे. मराठी संस्कृतीच्या वैभवशाली वारशाचे दूत म्हणून त्यांची ही नवीन भूमिका निश्चितच ऐतिहासिक ठरणार आहे!

Post a Comment

0 Comments