Type Here to Get Search Results !

मनिषा उदय डांगे यांची ‘अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद’च्या कोल्हापूर जिल्हा महिला जिल्हाध्यक्षपदी निवड

 मनिषा उदय डांगे यांची ‘अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद’च्या कोल्हापूर जिल्हा महिला जिल्हाध्यक्षपदी निवड



कोल्हापूर :  दि. २९ जुलै २०२५ –साहित्य, शिक्षण, समाजकार्य, प्रशासन आणि स्त्री-सक्षमीकरणाच्या विविध क्षेत्रांत दीर्घ व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मा. मनिषा उदय डांगे यांची ‘अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद’च्या कोल्हापूर जिल्हा महिला जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.


ही निवड परिषदचे राष्ट्रीय संस्थापक-अध्यक्ष डॉ. शरद गोरे (पुणे) यांच्या हस्ते अधिकृतपणे घोषित करण्यात आली असून, कर्नाटक प्रदेशाध्यक्ष व सीमाकवी रवींद्र  पाटील यांच्या शिफारशीवरून ही नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या नेतृत्वगुणांना आणि बहुआयामी सामाजिक योगदानाला दिलेली ही मान्यता संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.

डॉ. शरद गोरे यांनी साहित्य क्षेत्रातील महिला जिल्हाध्यक्ष म्हणून मनीषा डांगे यांच्या निवडीबाबत प्रतिक्रिया देताना म्हटले –"मनीषा डांगे यांची निवड ही साहित्य क्षेत्रातील स्त्रीशक्तीच्या उभारीचं प्रतीक आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली महिलांना नव्या साहित्यिक वाटा खुल्या होतील, नवोदित लेखिकांना प्रेरणा मिळेल आणि मराठी साहित्यविश्वात स्त्री संवेदनेचा नवा सूर फुलून येईल."


🔸 शैक्षणिक व सामाजिक परिचय

शिक्षण: B.A. (शिवाजी विद्यापीठात प्रथम क्रमांक व विद्यापीठ प्रतिनिधी), M.A., B.Ed (O-grade) ,नोकरी: सहशिक्षिका – हेरवाड हायस्कूल, हेरवाड ,माजी नगराध्यक्ष, कुरुंदवाड नगरपालिका ,माजी सदस्य, जिल्हा नियोजन समिती, कोल्हापूर

५०० हून अधिक व्याख्याने, कथाकथनाचे कार्यक्रम ,जिल्हास्तरीय निबंध, चारोळी, एकपात्री नाट्य स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके ,१० वीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये विशेष व्याख्याने ,विविध शैक्षणिक, सामाजिक, व सांस्कृतिक स्पर्धांचे परीक्षक ,महिला व विद्यार्थिनींसाठी मोफत वैयक्तिक कौन्सेलिंग ,प्रेमप्रकरणातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन ,‘कळी उमलताना’ या विषयावर विशेष सत्रांचे आयोजन ,स्वतःचे यूट्यूब चॅनल – ‘मनीषा डांगे – ज्ञान आणि संस्कार’ (शैक्षणिक व समाजप्रबोधन व्हिडिओ)


🔸 पुरस्कार व विशेष गौरव ,आदर्श शिक्षिका पुरस्कार ,आदर्श राजकीय व्यक्तिमत्त्व ,मलेका प्रेरणा पुरस्कार ,आदर्श महिला सन्मान

कुरुंदवाड नगराध्यक्षपदाच्या कार्यकाळात शहराला स्मार्ट सिटी बक्षीस (₹१ कोटी) मिळवून दिले – तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मान


या निवडीनंतर कोल्हापूर जिल्ह्यासह सीमाभागातून त्यांचे अभिनंदन केले जात असून, “डांगे मॅडम यांच्या नेतृत्वामुळे महिला साहित्य चळवळीला नवी दिशा मिळेल आणि परिषद कार्यात नवचैतन्य निर्माण होईल”, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष सीमाकवी रवींद्र पाटील यांनी व्यक्त केला आहे.

Post a Comment

0 Comments