✦ दुःखद बातमी ✦
देवाप्पा (बंडू) यशवंत घाडी यांचे दुःखद निधन
येळ्ळूर (ता. बेळगाव) येथील रहिवासी, महाराष्ट्र एकीकरण समितीचे खंदे समर्थक, व द.म.शि. मंडळ संचलित न्यू इंग्लिश हायस्कूल, मुतगे येथून सहा वर्षांपूर्वी निवृत्त झालेले आदरणीय निवृत्त शिक्षक देवाप्पा (बंडू) यशवंत घाडी यांचे दिनांक ६ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने एक हसतमुख, बोलकं आणि विद्यार्थीप्रिय शिक्षक हरपला आहे.
त्यांचे अंतिम दर्शन व अंत्यसंस्कार दिनांक ७ ऑगस्ट रोजी सकाळी १०:३० वाजता येळ्ळूर येथील स्मशानभूमीत होणार आहेत.
गणित विषयाचे गाढे अभ्यासक, शिक्षक संघाचे सक्रिय पदाधिकारी, विद्यार्थ्यांच्या मनात स्थान निर्माण करणारे, शिस्तप्रिय, कलेतून शिकवणारे एक हाडाचे शिक्षक म्हणून त्यांचा लौकिक होता. एकत्र कुटुंबपद्धतीत वाढलेले, सर्व भावंडांत स्नेहभाव जपणारे आणि समाजात आदरणीय स्थान असलेले बंडू सर हे नामवंत इंजिनिअर व बिल्डर एम. वाय.घाडी सरांचे बंधू होत.
त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित मुलगी, मुलगा, बंधू-भगिनी असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने सर्व कुटुंब, नातेवाईक, विद्यार्थी व शिक्षकवर्ग हळहळ व्यक्त करत आहेत.
ईश्वर त्यांच्या पुण्यात्म्यास चिरशांती देवो.
ॐ शांती 🙏💐

Post a Comment
0 Comments