Type Here to Get Search Results !

शालेय शिक्षणमंत्री दादासाहेब भुसे यांच्या सोबत मंत्रालयात शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित प्रश्नांवर महत्त्वपूर्ण बैठक

शालेय शिक्षणमंत्री दादासाहेब भुसे यांच्या सोबत मंत्रालयात शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित प्रश्नांवर महत्त्वपूर्ण बैठक


मुंबई, दि. ५ ऑगस्ट २०२५

शालेय शिक्षणमंत्री दादासाहेब भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मंत्रालयात शिक्षण क्षेत्रातील विविध प्रलंबित प्रश्नांबाबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस आमदार प्रा. जयंत आसगावकर (पुणे विभाग शिक्षक मतदार संघ), आमदार विक्रम काळे, आमदार ज. मो. अभ्यंकर, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार सतीश चव्हाण, आमदार अभिजीत वंजारी, आमदार निरंजन डावखरे, आमदार राजेश राठोड, आमदार सत्यजित तांबे यांच्यासह प्रधान सचिव व शिक्षण आयुक्त उपस्थित होते.

या बैठकीत खालील विषयांवर सकारात्मक चर्चा झाली:

  1. संचमान्यता – सदर विषय न्यायप्रविष्ट असून, न्यायालयाचा निकाल लागल्यानंतर शिक्षण आयुक्तांसमवेत आमदारांची बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असा निर्धार व्यक्त करण्यात आला.

  2. अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया – यामध्ये आलेल्या त्रुटी दूर करून प्रणाली अधिक सक्षम करण्याचे ठरविण्यात आले.

  3. टप्पावाढ – टप्पावाढीचा आदेश येत्या चार दिवसांत काढण्याचा निर्णय घेतला गेला.

  4. शिक्षकेतर कर्मचारी भरती – लवकरच या भरती प्रक्रियेबाबत सकारात्मक पावले उचलण्यात येणार असल्याचे संकेत दिले गेले.

या बैठकीत उपस्थित आमदारांनी शिक्षण क्षेत्रातील प्रश्न मांडताना शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अडचणी, शाळांच्या गरजा आणि धोरणात्मक निर्णयांचा आग्रह धरला. शिक्षणमंत्र्यांनी सर्व मुद्द्यांची गांभीर्याने दखल घेत सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.


Post a Comment

0 Comments