Type Here to Get Search Results !

आझाद मैदानात मनोजदादा जरांगे-पाटील यांची भेट – मराठा आरक्षणासाठी पाठिंबा जाहीर

आझाद मैदानात मनोजदादा जरांगे-पाटील यांची भेट – आमदार शिवाजी पाटीलांचा मराठा आरक्षणासाठी पाठिंबा जाहीर



मुंबई – आझाद मैदान येथे मराठा समाजाचे नेते मा. श्री. मनोजदादा जरांगे यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यात आली. मराठा आरक्षणासाठी निस्वार्थीपणे लढणाऱ्या मनोजदादांच्या परखड नेतृत्वाचे कौतुक करत त्यांना पूर्ण पाठिंबा दर्शविण्यात आला.


भेटीदरम्यान सांगण्यात आले की,

“मनोजदादांच्या मागण्या रास्त आहेत. त्यांनी दिलेली कोणतीही जबाबदारी मी एक मराठा लोकप्रतिनिधी म्हणून समर्थपणे पार पाडेन. मराठा बांधवांसाठी जेवण, पाणी किंवा वैद्यकीय मदतीची गरज लागल्यास मी तत्परतेने ती पुरविण्यास तयार आहे.”


 

राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी आरक्षणाच्या प्रश्नावर सकारात्मक भूमिका घेतल्याचा उल्लेख करत,

“मनोजदादा आणि मुख्यमंत्री साहेब लवकरच एकत्र येऊन तोडगा काढतील, असा मला विश्वास आहे. आजपर्यंत २० मुख्यमंत्र्यांपैकी १२ मराठा असूनही हा मुद्दा उचलला गेला नव्हता, मात्र विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  सकारात्मक भूमिका घेत आहेत,” असे मत व्यक्त करण्यात आले.

तसेच, “मराठा आरक्षणाची लढाई आरपारची आहे, मराठा समाज मागे हटणार नाही. शासनाने याची दखल घेऊन लवकरच आरक्षणाबाबत निर्णय घ्यावा,” अशी मागणीही करण्यात आली.

Post a Comment

0 Comments