कुद्रेमानी इंदिरा महिला को-ऑपरेटिव्ह सोसायटीची वार्षिक सभा उत्साहात संपन्न – 20 लाखांचा नफा

संचालिकाच्या हस्ते दिपप्रज्वलन करताना
कुद्रेमानी ( शिवसंदेश न्यूज) :इंदिरा महिला को-ऑपरेटिव्ह सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत आणि उत्साहात संपन्न झाली. यावर्षी सोसायटीने २० लाख ३८ हजार ९३३ रुपयांचा नफा कमावत सभासदांना १६% लाभांश जाहीर केला.
कार्यक्रमाची सुरुवात मराठी शाळेच्या मुलींनी ईशस्तवन व स्वागतगीताने केली. दीपप्रज्वलन व प्रतिमापूजन संचालिका यांनी केले. सेक्रेटरी गुरुनाथ पुंडलिक देवण यांनी प्रास्ताविक केले, तर अध्यक्षस्थानी मल्लव्वा दिपक पाटील होत्या.
निवेदन वाचन संचालिका उज्ज्वला रामचंद्र कांबळे यांनी केले. नफातोटा व ताळेबंद पत्रकाचे वाचन ओमकार वामन कदम यांनी केले.
या वेळी मार्गदर्शनपर भाषण करताना रवींद्र पाटील म्हणाले की, “सहकारी पतसंस्था ही ग्रामीण भागातील लोकांची आर्थिक नाडी आहे. ती गरिब-गरजूंना तसेच व्यवसायिकांना सहजरित्या कर्ज पुरवठा करून उभारी देणारे कार्य करते. अल्पावधीतच या सोसायटीची उल्लेखनीय प्रगती होत आहे.”
यावेळी दिपक पाटील, गोपाळ चौगुले, विनायक पाटील, वैजनाथ राजगोळकर, शंकर पाटील यांनी मार्गदर्शनपर भाषणे केली.
विशेष कार्यक्रमात कुद्रेमानी ग्राम पंचायतचे चेअरमन विनायक नारायण पाटील, निवृत्त सैनिक मनोहर पुंडलिक पाटील, तसेच गुणी विद्यार्थिनी स्वराली सतबा लोहार यांचा आणि सभासदांच्या गुणवंत मुलांचा सत्कार करण्यात आला.
ही वार्षिक सभा खेळीमेळीत, आनंदी वातावरणात आणि सहकार्याच्या भावनेने यशस्वीरीत्या पार पडली.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन राजश्री रमेश पाटील हिने मानले.
Post a Comment
0 Comments