कुद्रेमानी येथे दुर्गामाता युवक मंडळाचा दुर्गामाता मिरवणूक जल्लोषात आगमन
कुद्रेमानी (शिवसंदेश न्यूज ) :श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी दुर्गामाता युवक मंडळ, रवळनाथ नगर कुद्रेमाणी यांच्या वतीने घटस्थापनेच्या मुहूर्तावर दुर्गामाता उत्सवाची मिरवणूक जल्लोषात आगमन
यावेळी जोतिबा धोंडीबा गोवेकर, गुंडू मारुती पाटील, तुकाराम शटुपा गोवेकर, राजू वामन पाटील, उत्तम शटुपा गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली भाविकांनी एकत्र येऊन पारंपरिक धनगर वाद्यवृंदाच्या तालावर भंडाऱ्याची उधळण करत मिरवणुकीच्या माध्यमातून दुर्गामाता मूर्तीची स्थापना रवळनाथ येथे करण्यात आली.
दहा दिवस हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार असून अकराव्या दिवशी भव्य विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार आहे. या काळात भजन-कीर्तन, हरिपाठ, ठिपऱ्या, होम मिनिस्टर अशा मनोरंजन व प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
गावकऱ्यांच्या सहभागामुळे उत्सवाचे वातावरण मंगलमय झाले असून श्रद्धा, भक्ती आणि जल्लोष यांचा संगम यातून अनुभवायला मिळत आहे.


Post a Comment
0 Comments