नवरात्रारंभी पंढरीनाथ चरणी कुद्रेमाणी भक्त नतमस्तक ; आमदार दत्तात्रय सावंतांची भेट
संत परंपरेतून जीवनदिशा – आमदार दत्तात्रय सावंतांचे यांचे मार्गदर्शन
मध्यभागी आमदार दत्तात्रय सावंत व कुद्रेमानीचे भाविक भक्त .पंढरपूर (शिवसंदेश न्यूज) दि. 21: नवरात्रोत्सवाच्या मंगलमय प्रारंभ दिनी, घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर कुद्रेमाणीतील भाविकांनी पंढरपूर या वैकुंठीच्या ठिकाणी श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेस भेट देत भक्तीभावाची परंपरा जोपासली. यावेळी पुणे
या वेळी आमदार दत्तात्रय सावंत यांनी थोडक्यात मार्गदर्शन करताना सांगितले की, “भक्ती, श्रद्धा आणि एकोप्यामुळेच समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. संत परंपरेच्या माध्यमातून आपल्याला आदर्श जीवनाची दिशा मिळते. विठ्ठलभक्ती ही जीवनाला बळ देणारी आहे, अशी भक्ती प्रत्येकाने अंत:करणातून जोपासावी,” असे ते म्हणाले.
दरम्यान पुणे शिक्षक विधान परिषदेचे आमदार दत्तात्रय सावंत यांनी कुद्रेमाणी गावातील भक्तजन संत गजानन महाराज संस्थान येथे भेट देऊन भाविक भक्तांना सदिच्छा भेट दिली. त्यांनी स्नेहपूर्वक अल्पोपहाराची उत्तम सोय करून दिली. पुणे विभाग प्रमुख राजेंद्र आसबे , समाधान घाटगे व यांच्यासह कार्यकर्तेही उपस्थित होते.
या पवित्र दिवशी दर्शन मिळणे ही आयुष्यभराची अविस्मरणीय आध्यात्मिक अनुभूती असल्याचे भाविकांनी सांगितले. 🙏 “येरवी नाही कुणाचा आधार… पंढरीनाथा तूच आधार!” या भावनेतून भक्तांनी विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होत सुख, शांती आणि समृद्धीची प्रार्थना केली.
या प्रसंगी सीमाकवी रवींद्र पाटील सर यांच्या नेतृत्वाखाली भाविक भक्तांना आमदार साहेबांकडून सदिच्छा भेट मिळाली. उपस्थितांमध्ये –
रवींद्र मारुती पाटील, रोहिणी रवींद्र पाटील, आनंदी मारुती पाटील, शामला शिवाजी गुरव, सुरेश विठ्ठल पाटील, विमल सुरेश पाटील, शांताराम बळवंतराव गुरव, विद्या शांताराम गुरव, गावडू संभाजी पाटील, रेखा गावडू पाटील, जोतिबा मारुती बडसकर, शालन जोतिबा बडसकर, बाळाराम महादेव कदम, धोडिंबा पाटील, वैजनाथ कागणकर, गणपत बडसकर, सुमन नाना पाटील, रुक्मिणी विष्णू गुरव, गुरुनाथ गणपती पाटील व अंजना गुरुनाथ पाटील यांचा समावेश होता.
संपूर्ण कार्यक्रम भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात पार पडला.


Post a Comment
0 Comments